शोध न्यूज : नवी पिढी घडविण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकानेच आपल्याच सहकारी शिक्षकाचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून यामुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
समाजात गुन्हेगारी वाढतच निघाली आहे परंतु समाजातील काही घटकांवर अजूनही लोकांचा विश्वास आहे. शिक्षकी पेशा हा अत्यंत पवित्र मानला जातो परंतु काही शिक्षक या पावित्र्याला कलंकित करण्याचे पातक करीत असतात. आपल्याच विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या अनेक घटना आजवर समोर आलेल्याच आहेत परंतु आता तर एक शिक्षक दुसऱ्या शिक्षकाचा खून करू शकतो हे देखील जगाला पहावे लागले आहे. शिक्षक आपल्या वर्तनातून समाजापुढे एक वेगळा आदर्श घालून देत असल्याचे मागच्या काळात दिसत होते परंतु आता शिक्षक देखील गुन्हेगार असू शकतो याचेच प्रतिबिंब उमटले आहे. उस्मानाबाद शहरातील धीरज हुंबे नावाच्या शिक्षकाने सहकारी शिक्षक श्यामराव देशमुख यांचा खून केल्याचा आरोप या शिक्षकावर आहे. आर्थिक व्यवहारातून या 'गुरुजी' ने थेट खून करण्यापर्यंत मजल नेली असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
मयत शिक्षक श्यामराव देशमुख आणि आरोपी शिक्षक धीरज हुंबे हे उस्मानाबाद येथील भोसले हायस्कूलचे शिक्षक असून एकाच शाळेत दोघेही असल्याने त्यांच्यात आर्थिक व्यवहार होत होते. या व्यवहारातून त्यांच्यात काही वाद सुरु झाला आणि हा वाद टोकाला पोहोचला . आर्थिक देवाणघेवाणीतून दोघांत भांडण झाले आणि या भांडणात परस्परात मारहाण झाली. हा प्रकार एवढ्यावर थांबला नाही तर धीरज हुंबे या शिक्षकाने सहकरी शिक्षक श्यामराव देशमुख यांच्या डोक्यात दगडाने मारण्यास सुरुवात केली. या मारहाणीत शिक्षक देशमुख यांचा मृत्यू झाला आणि प्रचंड खळबळ उडाली. एक शिक्षकाचे हात दुसऱ्या शिक्षकाच्या रक्ताने माखले गेल्याची घटना अनेकांना धक्का देवून गेली आहे.
डोक्यात दगडाने मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेल्या देशमुख यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरानी त्यांचा मृत्यू झाले असल्याचे सांगितले. याप्रकरणी मयत शिक्षकाचा मुलगा वैभव देशमुख याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (The teacher committed the murder of the teacher by crushing him with a stone) ज्ञानदानाचे पवित्र कार्य ज्याच्या खांद्यावर आहे आणि नव्या पिढीला घडविण्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे अशा शिक्षकाने दगडाने ठेचून आपल्याच सहकारी शिक्षकाचा खून केल्याची घटना एक वेगळाच संदेश देवून गेली असून यामुळे शैक्षणिक वर्तुळात आणि विद्यार्थी वर्गात देखील अस्वस्थता दिसून येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !