BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ फेब्रु, २०२३

पंढरपूर तालुक्यात विवाहितेने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या !

 


शोध न्यूज : पतीच्या त्रासाला कंटाळून पंढरपूर तालुक्यातील एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 



महिलांविषयक कायदे कितीही कडक करण्यात आले असले तरी महिलांचा छळ आजही सुरु असून हुंड्यासाठी होत असलेल्या छळाच्या घटना घडतच आहेत. पैसा, सोने नाणे यासाठी आपल्याच घरातील सदस्यांना त्रास दिला जातो आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात छळ देखील केला जातो. अशा छळाला कंटाळून काही विवाहित महिला आपल्या आयुष्याचा शेवट करून घेतात. पैशाला चटावलेले भिक्कारछाप लोक विवाहित महिलांना हे टोकाचे पाउल उचलण्यास भाग पाडतात. अशा घटनात घट झालेली दिसत असली तरी देखील हे प्रकार अधूनमधून समोर येतच आहेत. पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील एका विवाहितेने विहिरीत उडी घेवून आपले जीवन संपवले असून याप्रकरणी मयत विवाहितेचा भाऊ गणेश प्रल्हाद आसबे यांनी पोलिसात दिली आहे. 


पंढरपूर तालुक्यातील खरसोळी येथील गणेश आसबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची बहीण शीतल यांचा विवाह उपरी येथील नवनाथ नागणे याच्याशी झाला होता. १५ एप्रिल २०१२ रोजी हा विवाह झाला होता आणि  विवाहात अडीच तोळे सोन्यासह ५१ हजार रुपयांचा हुंडा देण्यात आला होता. मागील तीन वर्षापासून पती नवनाथ नागणे हा आपल्या आई वडिलांचे सांगण्यावरून शीतल यांना मारहाण करीत होता. शिवाय माहेराहून सोने आणण्यासाठी मानसिक छळ देखील करीत होता. महिंद्रा पिकअप वाहन घेण्यासाठी पैसे आणि दोन तोळ्याचा आहेर अशी त्याची मागणी होती. यासाठी तो आपल्या पत्नीला त्रास देत होता. त्याची मागणी पूर्ण केली नसल्यामुळे तो शीतल यांचा शारीरिक, मानसिक छळ करीत होता असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

  

शीतल नागणे या विवाहितेचा मृतदेह  रविवारी एका विहिरीत आढळून आला होता. हुंड्यासाठी होत असलेल्या छळाला कंटाळूनच या विवाहितेने आत्महत्या केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी पती नवनाथ नागणे याच्यासह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी शीतल यांचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती परंतु आता याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून शीतल यांच्या मृत्यूचे कारण देखील समोर आले आहे. (A married woman committed suicide by jumping into a well in Pandharpur taluka)सदर गुन्हा दाखल झाल्याने पंढरपूर तालुक्यात, विशेषत: उपरी परिसरात खळबळ उडाली असून दबक्या आवाजात या घटनेबाबत चर्चा देखील सुरु झाली आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !