BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ फेब्रु, २०२३

धावती कार कोसळली थेट विहिरीत ! चालकाचा बुडून मृत्यू !

 


शोध न्यूज : धावती कार थेट एका विहिरीत कोसळली आणि यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना  शिरूर तालुक्यात घडली आहे. (Car Accident) कार चालकाचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.


अपघात रोजच होत आहेत पण काही अपघात हे अत्यंत धक्कादायक आणि विचित्र पद्धतीने घडलेले पाहायला मिळत असतात. रस्त्यावर समोरच्या वाहनाला धडकून होणारे अपघात नित्याचेच आहेत परंतु अलीकडे वाहन नदीत, कालव्यात पडून काही मृत्यू झाल्याचे समोर येत असते. पुलावरून कोसळलेल्या अनेक वाहनातील प्रवाशी पाण्यात बुडून मृत्युमुखी पडतात. रस्त्यालगत असलेल्या विहिरीत गाडी पडून होणारे अनेक अपघातही घडले आहेत आणि अशा अपघातात प्राण वाचण्याची शक्यता खूपच कमी असते हे देखील यातून दिसून आलेले आहे. (A speeding car crashes directly into a well, the driver dies) पुणे जिल्ह्यातील शिरूर येथूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून भरधाव वेगातील कार थेट विहिरीत कोसळली आणि हा अपघात झाला आहे. रस्त्यावरून वेगाने निघालेल्या कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि सदर कार थेट विहिरीत कोसळली.   


राहुल पठाडे हे कार चालवत भरधाव वेगाने निघाले होते. अण्णापूर येथे पोहोचले तेंव्हा वेगातील कारवरील त्यांचे नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे कार अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या विहिरीत कोसळली, ही विहीर पाण्याने भरलेली होती त्यामुळे पठाडे यांना काहीच हालचाल करता आली नाही. कार कोसळल्यानंतर त्यांना कारमधून भाहेर पडताच आले नाही त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून, गुदमरून मृत्यू झाला. दरम्यान ही घटना घडताच आजूबाजूचे नागरिक या विहिरीकडे धावत आले. स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्या मदतीने विहिरीत पडलेली कार बाहेर काढण्यात आली परंतु चालकाचा प्राण वाचू शकला नाही. विहिरीवर प्रचंड गर्दीही झाली होती आणि प्रत्येकजण हळहळ व्यक्त करीत होता. वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे चालकाने नेहमीच दक्ष राहण्याची किती गरज आहे हेच अधोरेखित होत आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !