BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ फेब्रु, २०२३

पंढरपूर पोलिसांनी लावला आणखी एका पिस्तुलाचा छडा !




शोध न्यूज : अंधारात उभा असलेला पिस्तुलधारी पोलिसांच्या हाती लागला असताना त्याच्याकडूनच आणखी एक विनापरवाना (Unlicensed pistol) गावठी बनावटीचे पिस्तुल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. 


अंबाबाई मैदानात संशयास्पद रीतीने थांबलेल्या धनाजी आटकळे याला पोलिसांनी गराडा घालून पकडला आणि त्याचा कमरेला असलेले विनापरवाना देशी बनावटीचे एक पिस्तुल (गावठी कट्टा) हस्तगत करण्यात यश मिळवले होते. कमरेला पिस्तुल लावून अंबाबाई मैदानात पंढरपूर तालुक्यातील शेगाव येथील धनाजी आटकळे याला पिस्तुलासह पकडून अटक केली. हा कशासाठी येथे थांबला होता आणि पिस्तुल कमरेला लावून तो कुणाची वाट पहात होता ? त्याच्या डोक्यात नक्की काय चालले होते ? पिस्तुल बाळगून त्याच्या डोक्यात पुढील काय नियोजन सुरु होते ? अशा सगळ्याच प्रश्नांनी सामान्य जनतेच्या मनात वादळ उठवले होते. (Pandharpur Crime) त्याने कुणाकडून आणि कशासाठी पिस्तुल मिळवले होते हे पोलिसांच्या तपासात उघड होणार होतेच परंतु पोलिसांनी लागोपाठ परप्रांतीय व्यक्तीला अटक करून आणखी एका पिस्तुलाचा छडा लावला आहे. 


शेगाव दुमाला येथील धनाजी सिद्धेश्वर आटकळे याला पिस्तुलासह अटक करून पोलिसांनी पुढील तपास वेगाने सुरु केला होता. पोलिसांनी या धनाजीकडे कसून चौकशी सुरु केली तेंव्हा त्याच्याच घरात आणखी एक विनापरवाना पिस्तुल असल्याची बाब समोर आली आणि त्याने ते आपल्या घरातून काढून देखील दिले. मूळचा उत्तर प्रदेशातील परंतु सद्या पंढरपूर येथील हॉटेल नागालँडच्या मागील बाजूला राहात असलेल्या सहजराम वर्मा यांच्याकडून त्याने पिस्तूल घेतले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी लगेच या परप्रांतीय वर्माला देखील अटक केली असून त्याने आणखी किती जणांना अशा प्रकारचे विनापरवाना आणि  गावठी पिस्तूल दिले आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.   


पंढरपूर तालुक्यातील आणि पंढरपूर शहरापासून जवळच असलेल्या शेगाव दुमाला येथील धनाजीकडे एक पिस्तूल आढळले त्यामुळे आधीच खळबळ उडाली होती आणि आता त्याच्याकडेच आणखी एक पिस्तूल मिळाल्याने या प्रकारची व्याप्ती वाढू लागली  आहे. या धनाजीला यापूर्वीच पाच चार चाकी वाहने चोरल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती अशी माहितीही आता पुढे आली आहे. (Another unlicensed pistol seized in Pandharpur taluka, two arrested) त्याच्याकडे लागोपाठ दुसरे विनापरवाना गावठी पिस्तूल आढळल्याने आणि त्याला हे पिस्तूल देणारा परप्रांतीय देखील पंढरपूरमध्येच राहत असल्याचे समोर आल्याने आणखी अशी किती पिस्तूल शहर, तालुक्यात दिली गेली आहेत हा देखील तपासाचा भाग बनला आहे. 


कुटुंबालाही होती भीती !


धनाजी आटकळे याच्याकडे असलेल्या पिस्तुलाची माहिती त्याच्या कुटुंबाला  देखील होती आणि ते देखील चिंतेत होते अशी माहिती समोर आली आहे. दारूच्या नशेत हा धनाजी पिस्तुलातील गोळ्या आपल्यावरच झाडतो की काय अशी भीती देखील त्याच्या पत्नीला आणि आईला वाटत होती. तसे त्यांनी पोलिसांसमोर सांगितले असून धनाजीकडील पिस्तूल पोलिसांनी हस्तगत केल्याचे समाधान देखील पत्नी आणि आईने व्यक्त केले आहे.  

  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !