शोध न्यूज : नेहमी खुसखुशीत भाषण करणारे राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्टवादीचे नेते अजित पवार हे एकदम संतापले आणि भाजपच्या एका कृतीबाबत अजीतदादानी भाजपची लाज काढली.
नरक 'वास' !
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे भाषण म्हणजे श्रोत्यांना एक वेगळी पर्वणी असते. रोकठोक बोलण्याबाबत प्रसिद्ध असलेले अजितदादा आपले भाषण अत्यंत खुमासदार पद्धतीने आणि मार्मिकपणे करीत असतातच पण कुठल्या कारणाने ते संतापले तर मग समोरच्याचे वस्त्रहरण केल्याशिवाय रहात नाहीत. आपल्या मतांशी ते कायम ठाम राहतात. आपल्याच पक्षाचा मोठा नेता असो किंवा सामान्य कार्यकर्ता असो, ते कुणालाही सोडत नाहीत. राजकीय विरोधकांची तर अत्यंत खुमासदार पद्धतीने 'धुलाई' करीत असतात. पुण्यात मात्र अजितदादा भाजपवर संतापले आणि 'भाजपला लाज वाटायला पाहिजे' अशा शब्दात त्यांनी भाजपला सुनावले आहे.
पोट निवडणुकीमुळे पुण्यातील वातावरण संपूर्ण राजकीय बनून गेले आहे. महाविकास आघाडी आणि भाजपचे नेते यांची पुण्यातील वर्दळ वाढली आहेच आणि प्रचाराचा धडाकाही जोरात सुरु आहे. अशा परिस्थितीत भाजपने गिरीश बापट यांना प्रचारात आणले आणि याचा प्रतिकूल परिणाम भाजपवरच होऊ लागला असल्याचे दिसत आहे. गिरीश बापट हे भाजपचे जेष्ठ नेते आहेत परंतु ते सद्या अतिदक्षता विभागात दाखल आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असताना निवडणुकीसाठी त्यांना रुग्णालयातून प्रचारासाठी बाहेर आणले. (Sick Girish Bapat in the election! Strong attack on BJP by Ajit Pawar) भारतीय जनता पक्षाची ही कृती सामान्य मतदारांना देखील पटली नाही आणि अजित पवार यांनी या कृतीवरच अत्यंत कडक शब्दात आपला संताप व्यक्त करीत भाजपची लाज काढली आहे.
"निवडणूक आली की भारतीय जनता पक्ष कुठल्याठी थराला जाऊ शकते. अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या नेत्याला देखील प्रचारात आणले जाते. बापट यांना ऑक्सिजनच्या नळ्या लावलेल्या अवस्थेत आयसीयूमधून बाहेर काढून निवडणूक प्रचारासाठी आणण्यात आले. जनाची नसेल तरी मनाची तरी लाज भारतीय जनता पक्षाला वाटायला पाहिजे होती. रुग्णालयात माणूस सिरीयस आहे आणि भाजपला मात्र निवडणुकीचे पडले आहे" अशा शब्दात अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाला सुनावले आहे. ज्यांनी अनेक वर्षे भाजपचे काम केले त्यांच्याबाबतीत खालच्या स्तराला जातात हे जनेतेने पाहिलेले आहे, यांच्यात धमक नाही ? भाजप केवळ लोकांना वापरून घेत असते. कै. लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांना विधानपरिषद आणि राज्य सभा निवडणुकीसाठी रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. दोन मते नसती तर आकाश पाताळ एक झाले असते काय ? दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे रुग्णालयात असताना त्यांना कसे वाचवता येईल असा प्रयत्न आम्ही केला, परदेशातून इंजेक्शन आणून दिले. आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या भाजपला जनताच जागा दाखवून देईल असे देखील त्यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !