शोध न्यूज : खुल्या मैदानात रावणाचे दहन करताना अपघात होऊन चाळीस जण जखमी झाल्याची घटना घडली असून या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे.
दसऱ्याच्या निमित्ताने रावणाचे दहन करण्याची परंपरा आहे त्यानुसार देशभर सर्वत्र रावण दहन केले जात असते. उंचच्या उंच रावणाची प्रतिकृती तयार करून त्याचे दहन केले जात असते. यावेळी मोठी सावधगिरी बाळगण्याची गरज असते परंतु कधी कधी अनुचित घटना घडल्याचे देखील समोर येत असते. हरियाणामधील यमुनानगर येथेही उत्साहात रावण दहन करीत असताना मात्र मोठा अपघात झाला आणि या अपघातात चाळीस जण जखमी झाले आहेत. रावणाचे दहन केल्यानंतर लाकूड उचलण्यासाठी नागरिक पुढे गेले असताना रावणाची उंच आणि मोठी पेटलेली प्रतिकृती थेट नागरिकांच्या अंगावर कोसळली. यामुळे चाळीसहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. ही घटना चित्रित झाली असून त्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
यमुनानगर येथे सत्तर फुट उंच रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले पण पेटलेला रावण थेट लोकांच्या अंगावर कोसळला त्यामुळे हा मोठा अपघात झाला. यावेळी प्रचंड गोंधळ उडाला. पेटता रावण अंगावर पडल्यामुळे नागरिक देखील भाजले. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली. रावणाच्या प्रतिकृतीत पेटलेल्या फटाक्यांमुळे देखील कुणाचे कपडे पेटले तर काहीना भाजले गेल्याचे सांगण्यात येत आहे. (Forty people were burnt and injured while Ravana Dahan) या थरारक घटनेचा व्हिडीओ देशभर पहिला जाऊ लागला असून तुम्हीही पहा हा व्हिडीओ ! (त्यासाठी खालील लाईनवर टच करा !)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !