BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ फेब्रु, २०२३

एकाच झाडावर तरुण तरुणीने घेतला गळफास !

 


शोध न्यूज : प्रेमी युगुलाने एकाच झाडावर गळफास घेतल्याचे अत्यंत वेदनादायी चित्र आज सोलापूर जिल्ह्यात आढळून आले असून ही आत्महत्या आहे की घातपात आहे याबाबत अजून तरी काही माहिती हाती आलेली नाही.  


काही महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात एका प्रेमी युगुलाने अशाच प्रकारे गळफास घेवून आत्महत्या केली होती आणि ती घटना आत्महत्येचीच असल्याचे समोर देखील आले होते. आज पुन्हा अशीच एक घटना समोर आली असून यामुळे सोलापूर जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला आहे. उत्तर सोलापुरातील कवठे येथे ही घटना आज काहींनी पहिली आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. देगाव ते कवठे या रस्त्यावरील कालव्याच्या बाजूला असलेल्या एका शेतातील झाडावर युवक आणि युवती यांचे मृतदेह लटकताना दिसून आले आहेत. सदर दोन्ही मृतदेह  हे प्रेमी युगुलांचे असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे परंतु पोलीस तपासात अधिक माहिती पुढे येणार आहे. (Lovers hanged themselves on the same tree) कवठे शिवारातील एका लिंबाच्या झाडावर युवक आणि युवती यांचे मृतदेह गळफास घेतल्याने लटकत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले आणि त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. 


सदर माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि झाडावर लटकत असलेले मृतदेह खाली काढले. त्यांना तातडीने सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्यांचा आधीच मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न झाले. यातील मयत मुलगी लक्ष्मी शिवाजी तांबे ही सोलापूर येथील भारती विद्यापीठात अकराव्या इयत्तेत शिकत असल्याची तसेच मृत तरुण हा मोहोळ तालुक्यातील खुनेश्वर येथील सुरज कुंडलिक चव्हाण असल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी महाविद्यालयीन विद्यार्थिनीची एक बॅग आणि एक दुचाकी आढळून आली आहे. ही आत्महत्या असेल तर त्यांनी कशासाठी हा टोकाचा निर्णय घेतला ? हा प्रकार आत्महत्येचाच आहे की घातपात ? या प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासात मिळणार आहेतच परंतु या घटनेने सोलापूर जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !