शोध न्यूज : भरधाव वेगातील एका कारने पाच महिलांना चिरडून मारल्याची घटना घडली असून पाच महिलांचा जीव घेणारा मात्र अपघात करून पळून गेला आहे.
अपघात ही गंभीर घटना अलीकडे अगदीच सामान्य होऊ लागली असून निरपराध आणि निष्पाप लोकांचे जीव घेत बेफिकीर वाहने धावत असतात. वेगामुळे मोठे अपघात होतात याची माहिती सर्वांनाच असते परंतु तरीदेखील प्रत्येकाला घाई झालेली असते. नको तेथे निवांत थांबणारे रस्त्यावर आले की भलतेच घाईत असतात आणि त्यांच्या वेगळा कसली मर्यादा नसते. अशा बेपर्वाईतूनच एकाने भरधाव कारने पाच महिलांना चिरडून मारले तर बारा महिलांना जखमी केले आहे, पुणे जिल्ह्यातील खेड परिसरातील खरपुडी फाट्यावर हा भीषण अपघात झाला. (Five women were crushed to death by a speeding car) पुण्याकडून एक महिंद्रा एक्सयुव्ही कार अत्यंत वेगात आली आणि रस्त्यावरील गरीब महिलांना चिरडले. यात दोन महिला जागीच मृत्युमुखी पडल्या तर १२ महिला गंभीर स्वरूपात जखमी झाल्या आहेत.
मंगल कार्यालयात वाढप्याचे काम करण्यासाठी १७ महिलांचा एक ग्रुप पुण्याच्या स्वारगेट येथून आला होता. पुणे महानगरपालिकेच्या बसने उतरून या महिला खरपुडी येथील कृष्णपिंगाक्ष मंगल कार्यालयात असलेल्या विवाह सोहळ्यात स्वयंपाक आणि वाढप्याचे काम करण्यासाठी निघाल्या होत्या यावेळी महिंद्रा एक्सयूव्ही किंवा टीयूव्ही या मॉडेलची कार अत्यंत वेगाने आली आणि या महिलांना चिरडून गेली. ही घटना घडली तेंव्हा महिलांनी प्रचंड आरडाओरडा केला, रस्त्यावर महिलांना चिरडल्याने काळ्या रस्त्यावर लाल रक्ताचा सडा पडला होता. अपघात करणाऱ्या कार चालकाने रस्त्याचा दुभाजक तोडून कारसह तेथून पलायन केले असून खेड पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !