शोध न्यूज : राज्यातील राजकारण रोज वेगळे वळण घेत असतानाच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांनी पोलिसांकडे स्वत: धाव घेत आपल्या घातपाताची शक्यता व्यक्त केली असल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात एक नवीच खळबळ उडाली आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण हे काही नेत्यासारखे सतत कुणावर तरी टीका किंवा आरोप करून राजकारण करणारे नेते नाहीत. त्यामुळे त्यांच्या संशयाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड पोलिसात एका अत्यंत धक्कादायक तक्रार दाखल केली असून आपल्या घातपाताचा प्रयत्न होत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबईत आणि नांदेड शहरात भाडोत्री खाजगी व्यक्तीकडून आपल्यावर पाळत ठेवली जाता असून ही व्यक्ती आपल्या पाठलागावर असते तसेच आपण करीत असलेल्या प्रवासाची आणि भेटीगाठीची माहिती जमा करीत असल्याचे आपल्याला दिसून आले आहे. आपला घातपात घडविण्याचे कारस्थान असावे असा मोठा संशय देखील अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. स्वत: चव्हाण यांनी नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची भेट घेऊन याबाबत लेखी तक्रार दाखल केली.
आपल्यावर सतत पाळत ठेवली जात असून आपली माहिती संकलित केली जात आहे.सदर अज्ञात भाडोत्री आणि खाजगी व्यक्तीच्या एकंदर वर्तनावरून आपला घातपात घडविण्याची शक्यता असावी असा संशय व्यक्त करीत पोलिसांनी याची तातडीने दखल घेत कारवाई करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पोलिसांकडे केली आहे.(Fearing casualty, the former chief minister ran to the police) या घटनेने राज्यात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे. आता पोलीस तपासात काय समोर येतेय याचीच राज्याला प्रतीक्षा लागली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !