BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ ऑग, २०२२

गणेशोत्सवाच्या धामधुमीत गणपती मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला !

 



शोध न्यूज : राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना आणि गणेशाचे स्वागत केले जात असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र गणपतीबाप्पांचीच चोरी करण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. 


राज्यात मोठ्या उत्साहात श्री गणेशाचे स्वागत केले जात आहे, घरोघरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करून मनोभावे पूजा केली जात आहे. सर्व संकटे दूर करणारा म्हणून श्रीगणेशाकडे पहिले जाते, त्यासाठीच त्याला विघ्नहर्ता असेही म्हटले जाते पण गणेशोत्सवाच्या वातावरणातच गणपती बाप्पावरच संकट आले आहे. सोलापूरजवळी हिप्परगा येथील गणपती मादिरावरील सोन्याचा कळस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला असल्याच बाब निदर्शनास आली असून यामुळे भाविकांत आणि नागरिकांत देखील खळबळ उडाली आहे. गणपती मंदिरावरील सोन्याचा कळस हा दुसऱ्यांदा चोरीस जाण्याची ही घटना आहे.


सोलापूर ते तुळजापूर रस्त्यावरील हिप्परगा या गावात मश्रूम गणपती मंदिर असून भाविकांच्या योगदानातून या मंदिरावर सोन्याचा कळस चढविण्यात आला होता. पंचवीस तोळे सोन्यापासून हा कळस तयार करण्यात आलेला होता पण हाच कळस अज्ञात चोरट्यांनी पुन्हा एकदा चोरून नेला असल्याची धक्कादायक आणि तितकीच खळबळजनक घटना समोर आली आणि भाविकांतून प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे. सहा महिन्यांपूर्वी वीज पुरवठा खंडित झाला असताना आणि मुसळधार पाऊस सुरु असताना याच मंदिरावरील कळसाची चोरी झाली होती आणि आता पुन्हा तीच घटना घडली आहे.


हिप्परगा येथील मश्रूम गणपती मंदिराची स्थापना सिद्धरामेश्वरांनी केलेली आहे आणि नंतरच्या काळात भाविकांनी या मंदिराचा कायापालट केला आहे. यावेळीच भाविकांनी या गणपती मंदिरावर सोन्याचा कळस लावलेला होता. भाविकांचे हे श्रद्धास्थान असून गणेशोत्सवाच्या काळातच चोरांनी मंदिरावरील कळस चोरून नेला आहे. (The theft of the gold culmination from the Ganapati temple)  या चोरीमुळे भाविकांत खळबळ तर उडालीच आहे पण प्रचंड संताप व्यक्त होत आहे. मंदिरावरील कळस पुन्हा पुन्हा चोरीला जातोच कसा ? असा संतप्त सवाल भाविक विचारू लागले आहेत. 


चौकशीची मागणी 

सदर चोरीची कसून चौकशी व्हावी आणि लवकरात लवकर चोरीला गेलेला सोन्याचा कळस परत मिळवून द्यावा अशी मागणी संतप्त भाविक करू लागले आहेत. मंदिराच्या पुजाऱ्यासह नागरिक देखील हीच मागणी करू लागले आहेत. देवाची देखील चोरी करण्यापर्यंत चोरांची मजल गेल्याने भाविकांत चीड निर्माण झाली आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !