शोध न्यूज : खून, दरोडे अशा अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी पाच वर्षांपासून फरार राहून सोलापूर जिल्ह्यातील एका शेतात शेतमजूर बनून राहिला पण पोलिसांनी त्याचा माग काढत त्याच्या मुसक्या अखेर आवळल्या आहेत.
'कानून के हात लंबे होते है' याची प्रचीती पुन्हा पुन्हा येत असते पण काही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देण्याचा प्रयत्न करीत असतातच. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी काही ना काही पुरावे ठेवून जात असतोच आणि पोलिसांना कितीही हुलकावणी दिली तरी एक ना एक दिवस त्याच्या हातात पोलीस बेड्या ठोकतातच असा नेहमीचा अनुभव आहे. अटक केलेले काही आरोपी पोलिसांच्या हातून निसटून जातात आणि नाव, रूप बदलून, परराज्यात जाऊन वावरत असतात पण पोलिसांना सुगावा लागतो आणि एक दिवस पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचतातच ! सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात जाऊन एक गुन्हेगार शेतमजूर बनून वावरत राहिला परंतु पुण्याच्या कोंढवा पोलिसांनी त्याचा माग काढला आणि त्याला बेड्या ठोकून घेवून गेले आहेत.
खून, दरोडे, जबरी चोऱ्या अशा प्रकारचे गुन्हे दाखल असलेला अविनाश धनाजी शिंदे (सुंदरनगर, मांगडेवाडी) हा आरोपी पाच वर्षांपासून कोंढवा पोलिसांना हुलकावणी देत होता. तब्बल पाच वर्षे तो फरार होता आणि पोलीस त्याच्या शोधात होते. पुण्यातील हा आरोपी थेट सोलापूर जिल्ह्यात आला आणि माढा तालुक्यातील उंदरगाव येथील एका शेतीत काम करीत राहिला. पोलीस त्याचा शोध घेत राहिले पण हा आरोपी उंदरगाव येथील शेतात शेतमजूर म्हणून काम करीत राहिला. येथे त्याचा कुणाला संशय आला नाही आणि त्याने आपल्याबद्धलची खरी माहिती चुकूनही बाहेर येवू दिली नाही. पुण्याचे पोलीस त्याची सर्व प्रकारे माहिती मिळवत होते आणि हा आरोपी उंदरगाव शिवारात ओळख लपवून वावरत होता.
पोलिसांनी त्याचा तपास चालूच ठेवला होता आणि हा तपास करताना सदर आरोपी हा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उंदरगाव शिवारात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांच्या हाती आली. पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने आणि कौशल्याने माढा तालुक्यात धाव घेतली आणि स्थानिक पोलिसांची मदत घेत पाच वर्षे फरार असलेल्या या अविनाश शिंदे याच्या मुसक्या आवळल्या. (An absconding accused in a serious crime became a farm labourer) शेतात मजुरीचे काम करणारा हा मजूर एवढा मोठा 'पराक्रम' करून आला होता याची माहिती मिळाल्यावर या परिसरात देखील खळबळ उडाली असून याच घटनेची चर्चा होऊ लागली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !