शोध न्यूज : भल्याभल्या श्रीमंतांना लाजविण्याचे काम एका भिकार्याने केले असून पैसा पैसा भीक मागून जमा झालेले पन्नास लाख रुपये एका भिकाऱ्याने दान केले असून भिकारी असला तरी तो मनाने किती श्रीमंत आहे हेच या घटनेतून दिसून आले आहे.
रस्त्यावर अथवा कोठेही भिकारी दिसला की त्याचा तिरस्कार केला जातो, वेगवेगळ्या पध्दतीने त्याची हेटाळणी केली जाते पण काही काही भिकारी हे नुसते पैशानेच नव्हे तर मनाने देखील प्रचंड श्रीमंत असतात. तसे पाहिले तर अनेक भिकारी अंगावर फाटके कपडे घालून फिरत असले तरी ते लखोपती असू शकतात. बेवारस भिकारी मृत्युमुखी पडल्यावर त्याच्या झोपडीत पोत्यात नोटाच नोटा असल्याचे यापूर्वी अनेकदा आढळून आले आहे. भिकारी हल्ली हायटेक होत असून पंढरपूर वारीत भीक मागणाऱ्या बहुसंख्य भिकाऱ्याकडे मोबाईल असल्याचेही दिसून येते. केवळ भीक मागतो म्हणूनच त्याला भिकारी म्हणायचे अन्यथा ते किमान मध्यमवर्गीयांपेक्षा कमी नसतात. पंढरपूर येथील एक भिकारी तर पार्ट टाईम भीम मागण्याची ड्युटी संपली की व्याजाचे पैसे वसूल करण्यासाठी रिक्षातून शहरभर फिरत असतो. मंदिर परिसर आणि चंद्रभागेच्या पात्रात भीक मागणारा हा अपंग भिकारी चक्क सावकारी करीत असतो अशी चर्चा वर्षानुवर्षे ऐकायला मिळत असते. स्वत:साठी भीक मागणारे अनेकजण आहेत पण भीक मागून आलेली रक्कम दान करणारा वेगळाच आणि श्रीमंत मनाचा भिकारी समोर आला आहे.
समाजात एकापेक्षा एक श्रीमंत व्यक्ती असतात तरी त्यातील काहींचा दुसऱ्यांच्या संपत्तीवर डोळा असतो. मुबलक श्रीमंती असली तरी त्याला आणखी मिळेल तेवढे हवेच असते पण या श्रीमंतांना लाजविण्याचे काम तामिळनाडू येथील एक भिकारी करीत आहे. भीक मागून आपला उदरनिर्वाह करणारा हा भिकारी जवळ जमलेली रोख रक्कम हा इतरांसाठी दान म्हणून देवून टाकतो. पुलपांडियन नावाच्या या भिकाऱ्याने गरीब आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फंडासाठी तब्बल ५० लाख दान म्हणून दिले आहेत. तुतूकडी जिल्ह्यातील पुलपांडियन हा भिकारी असला तरी मनाने तो सर्वात श्रीमंत ठरत आहे. चार चाकी गाडीत फिरणारे आणि ऐषारामाचे जीवन जगणारेही जे करू शकत नाहीत असे मोठे काम हा सामान्य भिकारी करीत आहे त्यामुळे त्याची मोठी चर्चा सुरु आहे. भीक मागून रुपया रुपया जमा करण्याचे त्याचे रोजचेच काम असून आपले पोट भरले की उरलेली जवळची सगळी रक्कम तो मुख्यमंत्री फंडाला देवून टाकतो. त्याचा हा नेहमीचाच शिरस्ता आहे. त्याची ही दानशूर वृत्ती पाहून भले भले थक्क होत असतात पण त्याला मात्र याचे काहीच वाटत नाही.
पुलपांडियन याच्या मनाच्या श्रीमंतीचे कौतुक होत असून कोट्यावधी रुपये बँकेत असताना पैसे मिळविण्यासाठी अनैतिक कामे करतो तो श्रीमंत की हा पुलपांडियन श्रीमंत ? मनाने प्रचंड श्रीमंत असलेल्या या पुलपांडियनचे समाजात मोठे कौतुक होत आहे. (A beggar with a rich mind, donated millions by begging) समाजात अगणित लोक मोठे श्रीमंत आहेत पण लोक खऱ्या अर्थाने या पुलपांडियन यालाच जगातील सर्वात मोठा श्रीमंत मानू लागले आहेत. स्वत:च्या पोटाची भ्रांत असताना भीक मागून हा पुलपांडियन गरीब, गरजूच्या मदतीसाठीच भीक मागत आयुष्य काढत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !