BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ मार्च, २०२३

पती पत्नीत अफलातून भांडण, गॅलरीतून थेट कोसळले खाली ! VDO



शोध न्यूज : नवरा बायकोत झालेल्या भांडणात दोघेही एवढ्या टोकाला गेले की ते घराच्या गॅलरीतून चक्क खाली कोसळले आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल होऊन तो जगभरात पहिला जात आहे.


नवरा बायको यांच्यातील भांडण ही काही वेगळी आणि दुर्मिळ बाब नाही परंतु तरीही काही नवरा बायको यांच्यातील भांडण हे चर्चेचे ठरत असते आणि कुठल्यातरी वेगळ्या कारणाने गाजत असते. नवरा बायको यांच्या दरम्यान होत असलेली भांडणे अनेक कारणांनी होत असतात, यातील काही कारणे गंभीर असतात तर काही कारणे केवळ हास्यास्पद असतात. चारित्र्याच्या संशयावरून जसे हे नाते टोकाचे ताणले जाते तसे केवळ साडी घेण्यावरून झालेला वाद देखील न्यायालयापर्यंत पोहोचतो. हल्ली समाज माध्यमाचे युग आलेले असल्याने अनेक नवरा बायकोतील भांडणाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळतो आणि लोक देखील मोठ्या चवीने तो पहात असतात. असाच एक व्हिडीओ जगभर व्हायरल झाला असून नवरा बायको आपसातील भांडणात एवढे मग्न आहेत की त्यांना आजूबाजूची कसलीच जाणीव नसल्याचे दिसत आहे.


नवरा आणि बायकोत जोराचे भांडण सुरु होते. आपल्या घराच्या गॅलरीमध्ये या भांडणाच्या ठिणग्या पडू लागतात. हे भांडण पुढे एवढे वाढू लागते की यात दोघांचा जीव संकटात येतो पण या दोघानाही याची साधी जाणीवही झालेली नसते. आधी जोरजोराने भांडणारे हे नवरा बायको पुढे हातघाईवर येतात, आपण गॅलरीत भांडत आहोत याचीही जाणीव यांना उरत नाही त्यामुळे भांडणात बाल्कनीचे रेलिंग देखील तुटते आणि दोघेही वरून थेट खाली कोसळतात. रेलिंग तुटून वरच्या मजल्यावरून ते थेट खाली आणि अत्यंत जोराने पडतात त्यामुळे दोघेही खाली पडून बेशुद्ध झालेले पाहायला मिळतात. गॅलरीत सुरु असलेली पती पत्नीची भांडणे रस्त्यावरून जात असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली आणि नंतर हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. 

 तुम्हीही पहा हा व्हिडीओ !




हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात पहिला जात आहे आणि नेटकरी आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. कुणी या घटनेला मिळालेली शिक्षा असे म्हणत आहे तर कुणी व्हिडीओ चित्रित करणाऱ्याला दोषी ठरवत आहे. चित्रण करण्यापेक्षा भांडण सोडविण्यासाठी गेले असते तर बरे झाले असते असे काहींचे मत आहे तर टोकाचे भांडण करणाऱ्याना मिळालेली ही शिक्षा आहे असे मत कुणी मांडत आहे. (Viral video, husband and wife fight, falls from gallery) प्रतिक्रिया उलटसुलट येत असल्या तरी हा व्हिडीओ मात्र मोठ्या संख्येने पहिला जात आहे    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !