BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ फेब्रु, २०२३

आमदारांच्या घरात घुसून तरुणाचा राडा ! दगडफेक करीत केला हल्ला !

 


शोध न्यूज : जत येथील कॉंग्रेस आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या घरात घुसून एका तरुणाने दगडफेक करीत हल्ला केला केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून यामुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 


लोकप्रतिनिधी यांच्या समर्थकांची संख्या मोठी असते तसे त्यांच्यावर राग व्यक्त करणारेही अनेकजण असतात. राजकीय विरोध हा भाग वेगळा केला तरी आपली कामे न केल्यामुळे अनेक नागरिक नाराज असतात तर कुणी आमदार, खासदार यांच्यावर राग धरून देखील असतात. हा राग लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकीत काधालाही जातो पण कधी कधी हा राग एवढा उफाळून आलेला असतो की काही माथेफिरू थेट हल्ला करण्याचा प्रयत्न करीत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील जत येथील कॉंग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या निवासस्थानी घडला असून राडा करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला कार्यकर्त्यांनी चांगलाच 'प्रसाद' देखील दिला आहे. आमदार विक्रमसिंह सावंत यांनी मात्र एवढी मोठी घटना घडूनही आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला आहे. 


प्रतिक देशमाने याचा दोघांशी काही कारणावरून वाद झाला होता. मोबाईल हॅक करण्याच्या कारणातून हा वाद होता.  हा राग प्रतीक देशमाने याच्या डोक्यात चांगलाच घर करून बसला होता. या रागातून त्याने सदर दोघांची चौकशी केली, 'तुम्ही कुठे आहेत'? अशी विचारणा प्रतिकाने या दोघांना केली तेंव्हा त्यांनी 'आम्ही आमदार साहेबांच्या घरासमोर आहोत' असे त्यांनी सांगितले. प्रतीक हा त्याच्या वडिलांना सोडण्यासाठी बँकेत गेला होता पण हे दोघे आमदार यांच्या घरासमोर असल्याची माहिती मिळताच तो थेट आ. सावंत यांच्या सावंत गल्लीतील घराकडे गेला.  आमदारांच्या घरात घुसून त्याने जोरदार राडा सुरु केला. अंगणातील झाडाची कुंडी उचलून त्याने जोराची आदळआपट सुरु केली. आमदार सावंत यांच्या गाडीचेही नुकसान केले. दगडफेक करीत या तरुणाने जोरदार हल्ला सुरु केला. 


अचानक घडत असलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. सुदैवाने आमदार सावंत हे घरी नव्हते. ते बाहेर गेलेले होते पण एक सुरक्षारक्षक त्यांच्या निवासस्थानी तैनात होता. तेथे उपस्थित असलेले काही या घटनेने गोंधळून गेले आणि हल्लेखोर प्रतीक देशमाने या तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर मात्र कुणालाही जुमानत नव्हता. त्याचा राडा सुरूच होता. अखेर तेथील कार्यकर्त्यांनी त्याला पकडला आणि त्याची जोरदार धुलाई करीत वठणीवर आणला. चांगलाच प्रसाद देऊन या कार्यकर्त्यांनी त्याला पोलिसांच्या हवाली केला. या हल्लेखोराने मादक पदार्थाचे सेवक केल्यामुळे तो कुणाचे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे कार्यकर्ते सांगत होते. हा हल्ल्याचा प्रकार एकदम अनपेक्षित होता आणि त्यामुळे आमदार सावंत यांच्या निवासस्थानी एकच गदारोळ उठला होता. आजूबाजूचे लोक देखील येथे जमा झाले होते. 


आमदार सावंत याना या घटनेबाबत माहिती मिळाली आणि हल्लेखोराला पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे समजले तेंव्हा सावंत यांनी या तरुणाला सोडून देण्याची विनंती पोलिसांना केली. त्यांच्या घरात घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या गाडीची तोडफोड केली तरीही आ. सावंत यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत या तरुणाला माफ करण्याची भूमिका घेतली. (MLA Vikram Singh Sawant's house was attacked, vandalized car) त्यांच्या या उदार भूमिकेचे जनतेतून देखील कौतुक होत आहे परंतु हल्लेखोराची मात्र चर्चा सुरु झाली आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !