BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ जाने, २०२३

सुषमा अंधारे यांचा घातपात ? माहिती मिळाल्याचे अंधारे यांनीच सांगितले !

 


शोध न्यूज : शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांचा घातपात किंवा अपघात होऊ शकतो याबाबत अंधारे यांनीच जाहीरपणे सांगितले असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

कुणाची घाण, कुणाला त्रास !

✪ 🅾 दुर्गंधीचा तिसरा दिवस ! 🅾 ✪ 🅾️ लक्ष्मीटाकळी उपनगरात गटार तुंबलेलीच ! लक्षपूर्वक दुर्लक्ष, वाढू लागली दुर्गंधीची व्यापकता ! ...! ✪


शिवसेना फोडण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांनी केला आणि त्यात ते यशस्वी झाले. ज्या भाजपाला कंटाळून राजीनामा द्यायला निघालेले एकनाथ शिंदे भाजपशी हातमिळवणी करीत मुख्यमंत्री झाले आणि शिवसेनेला  मोठी घरघर लागली. सत्ता तर गेलीच पण त्यापाठोपाठ अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेना सोडून जाऊ लागले आणि अशा संकटाच्या काळात बहुजन चळवळीच्या सुषमा अंधारे यांनी शिवबंधन बांधले. 'खोबरं तिकडं चांगभलं' अशा न्यायाने राजकरण चालत असताना सुषमा अंधारे यांनी मात्र प्रवाहाच्या विरोधात आपला मार्ग निवडला.  बोट बुडताना सर्वात आधी उंदरे बाहेर पडतात असे सांगितले जाते पण अशा संकटाच्या स्थितीत सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत दाखल होण्याचा निर्णय घेतला. अशी उदाहरणे फार क्वचित घडतात. सत्तेकडे प्रवाह सुरु होतो आणि हवेचा रोख पाहून शेतकरी धान्य उफणतो हे सर्वमान्य आहेच पण अंधारे यांच्याबाबत हे उलटे घडले त्यामुळे त्यांच्याबाबत राज्यात आदराची भावना निर्माण झाली आहे. 


सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र पिंजून काढला आणि गद्दार म्हणवले जात असलेल्या शिंदे गटाचे पुरते वस्त्रहरण केले. आपल्या खास शैलीत सुषमाताई अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजपचे पुरते वस्त्रहरण केले. सत्तेसाठी काहीही घडू शकते, कुणीही बेईमान होऊ शकतो आणि गद्दार होऊ शकतो हे अंधारे यांनी केवळ दाखवून नव्हे तर पटवून दिले आणि राज्यात पुन्हा शिवसेनेची ज्योत तेवत ठेवली. सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेत शिंदे गट आणि भाजप यांच्यावर लोकांना पटतील अशा शब्दात प्रहार केले आणि त्यांना राज्यात तुफान प्रतिसाद मिळाला. भाजप विरोधी सत्य बोलणाऱ्यावर एक तर ईडीची कारवाई सुरु होते अथवा कुठल्या ना कुठल्या प्रकरणात त्यांना गुंतवले जाते असा आरोप विरोधक सातत्याने करीत असतात. (Shiv Sena leader Sushma Andhare assassination conspiracy) कुठल्याही मार्गाने अशा नेत्यांना संपविण्याचा कट केला जातो याबाबत देखहेविरोधकांनी अनेकदा दाखवून दिले असून विरोधी पक्षाचे नेते तुरुंगात गेल्याने हे स्पष्ट देखील झालेले आहे. 


शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी तर शिंदे गट आणि भाजप यांचे पुरते वस्त्रहरण केले असून नेते कुठेही उद्या मारत असले जनमत आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे दाखवून दिले आहे त्यामुळे सुषमा अंधारे या 'टार्गेट' होताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत अंधारे यांनीच मोठा गौप्यस्फोट केला असून आपला घातपात किंवा अपघात होऊ शकतो आणि याची माहिती आपणास अधिकाऱ्यांनीच दिली असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. तुमच्या मागे चौकशी लावण्यासारखं काही नसल्याने अपघात घडविला जाऊ शकतो अशी माहिती अधिकाऱ्याने दिली असल्याचे अंधारे यांनी सांगितले आहे. माझ्याविरोधात तक्रारी दाखल होतील. आगामी काळात माझ्यावर काही संकटं येऊ शकतात. मात्र मला त्याची पर्वा नाही. मला वाटतं की माणसं जागी झाली पाहिजेत. काही लोक, अधिकारी मला सांगतात की, रात्रीचा प्रवास टाळा. घात-अपघात होऊ शकतो, असं विधान सुषमा अंधारे यांनी नी केलं आहे. आतापर्यंत अपघातात अनेकजण गेले आहेत. तुमच्यावर आरोप करण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. त्यामुळे ते तुम्हाला थेट गोळी घालण्याऐवजी तुमचा अपघात घडवून आणू शकतात. माझी प्रतिकात्मक तिरडी बांधू देत किंवा प्रत्यक्ष तिरडी बांधू देत, मी मात्र माझं काम प्रमाणिकपणे करण्याचे ठरवलेले आहे, असे अत्यंत निर्भयपणे सुषमा अंधारे यांनी जाहीरपणे सांगितले आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !