शोध न्यूज : भीमा नदीच्या पात्रातील सात जणांचा मृत्यू हे खून असून चुलत भावानेच हे हत्याकांड घडवून आणले असल्याचे उघडकीस आले आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह भीमा नदीच्या पात्रात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती आणि ही सामुहिक आत्महत्या असल्याचे समोर आल्याने महाराष्ट्र हादरून गेला होता. आत्महत्येचे सांगितले गेलेले कारण हे न पटण्यासारखे होते आणि अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळवले असून ही घटना सामुहिक आत्महत्या नसून नात्यातील व्यक्तीनेच सात जणांचे केलेले हे खून असल्याची अत्यंत धक्कादायक माहिती उजेडात आली आहे त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकला आहे. पन्नास वर्षीय आजोबापासून नातवापर्यंत सात जणांचे मृतदेह आढळून आले होते यात पती पत्नी, मुलगी जावई आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. मुलाने मुलगी पळवून नेल्याने आणि त्याने वडिलांचे न ऐकल्यामुळे सर्वांनी आत्महत्या केल्याचे सांगितले गेले होते परंतु धक्कादायक सत्य समोर आले आहे.
कौटुंबिक वादातून चुलत भावाने या सात जणांची हत्या केल्याचा अत्यंत धककादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. मोहन पवार आणि त्यांचे कुटुंबीय हे १७ जानेवारी रोजी भीमा नदीजवळ आले तेंव्हा त्यांना चुलत भावाने अडवले आणि त्यांना बेशुद्ध करून त्यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या तीन मुलानाही भीमा नदीत फेकून देण्यात आले. बेशुद्धावस्थेतच त्यांचा भीमा नदीच्या पाण्यात मृत्यू झाला असल्याची बाब उघडकीस आली आहे. मयत मोहन पवार हे मुळचे बीड जिल्हयातील गेवराई परिसरातील रहिवासी असून एक वर्षापूर्वी कुटुंबासह दौंड परिसरातील पारगाव येथे राहण्यास आले होते. शेतमजुरी, माती खोदकाम, उसतोडणी अशी कामे ते करत होते. तर, त्यांचे जावई शामराव फुलवरे हे आपल्या कुटुंबासह उस्मानाबाद, वाशी येथे राहत होते. त्यांचा अत्यंत धक्कादायक पद्धतीने भीमा नदीच्या पात्रात शेवट झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !