BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ जाने, २०२३

कोवळ्या बालकाचा खून, नराधम पित्याला अटक !

 



शोध न्यूज : अवघ्या सात महिने वयाच्या कोवळ्या बालकाचा खून केल्याप्रकरणी नराधम पित्याला पंढरपूर पोलिसानी बेड्या ठोकल्या असून खुनाच्या कारणाचा मात्र अद्याप उलगडा झालेला नाही. 


गुन्हेगारी कधी कुठल्या ठराला जाईल याचा काही भरवसा उरलेला नाही. एकमेकांना आधार देणारी नातीच एकमेकांच्या जीवावर उठताना नेहमीच दिसतात. येथे तर पित्यानेच आपल्या कोवळ्या आणि केवळ सात महिन्याच्या बालकाची हत्या केल्याचे पोलीस तपासात आढळले असून पोलिसांनी नराधम पित्याला अटक केली आहे. पंढरपूर तालुक्यात सुपली गावाच्या परिसरातील कालव्यात  २८ डिसेंबर २०२२ रोजी एका बालकाचा मृतदेह आढळून आला होता. या बालकाचे वय केवळ सात महिने असल्याचे दिसून आले होते. याप्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल काण्याकरण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास केला असता जन्मदात्या पित्यानेच या मुलाचा खून केला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली असून या बालकाचा पिता सुभाष डुकरे याला अटक करण्यात आली आहे. 


२८ डिसेंबर २२ रोजी उसं तोडणी मजुराच्या टोळीतील एकाचा सात महिन्याचा मुलगा मृतावस्थेत आढळल्याने पोलिसांनी त्यावेळी अकस्मात मयत म्हणून नोंद केली होती. या घटनेचा पोलिसांनी अधिक तपास सुरु केला होता. तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळत गेली आणि अकस्मात मयत म्हणून नोंद असलेल्या या मुलाचा प्रत्यक्षात खून झाला आहे आणि हा खून त्याच्या पित्यानेच केला आहे अशी माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुभाष डुकरे याच्याविरुद्ध बालकाचा खून केल्याचा गुन्हा दाखल केला आणि डुकरे याला अटक करण्यात आली. सदर खून कशासाठी आणि कशा प्रकारे करण्यात आला याबाबत आता पोलीस तपास करीत असून आरोपी डुकरे याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. (Murder of  child, murderer father arrested) या दरम्यान या खुनाबाबत आणखी अधिक माहिती पोलिसांच्या हाती येईल. ही घटना उघडकीस आल्याने ऊस तोडणी मजुरात खळबळ उडाली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !