BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ जाने, २०२३

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा लिफ्ट अपघात !

 


शोध न्यूज : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा लिफ्ट अपघात झाला असून या अपघाताबाबत अजित पवार यांनी स्वत:च माहिती दिली आहे. 


कुठल्या न कुठल्या प्रकारे नेत्यांचे अपघात होण्याचे प्रकार वाढत असून आ. विनायक मेटे, आ. जयकुमार गोरे, आ. योगेश कदम, आ. धनंजय मुंडे यांच्या अपघाताच्या घटना घडल्या असून यामुळे चिंता व्यक्त होत असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा एक वेगळाच अपघात पुण्यात घडला. या अपघाताची माहिती सार्वजनिक झाली नव्हती परंतु अजित पवार यांनी उशिराने स्वत:च याबाबतची माहिती दिली आणि अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. पुण्यातील एका कार्यक्रमात दीप प्रज्वलन करताना राष्टवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतल्याची मोठी घटना घडली होती. सुदैवाने यात त्यांना अथवा अन्य कुणालाही इजा झाली नाही. या घटनेने राज्यभर चिंता व्यक्त केली जात असतानाच अजित पवार यांचा देखील अपघात झाला परंतु याची माहिती बाहेर आलेली नव्हती. उशिराने जेंव्हा पवार यांनीच ही माहिती दिली तेंव्हा कार्यकर्त्यांच्या काळजात धस्स झाले. 


पुण्याच्या एका रुग्णालयात अजित पवार गेले असता त्यांची लिफ्ट तिसऱ्या मजल्यावरून चौथ्या मजल्यावर जात असताना मध्येच वीज पुरवठा बंद पडला आणि चौथ्या मजल्यावरून त्यांची लिफ्ट थेट खाली कोसळली. अजित पवार हे पुणे दौऱ्यावर असताना हर्डीकर हॉस्पिटलमध्ये उद्घाटन सोहळ्यासाठी ते गेले होते, यावेळी ही मोठी घटना घडली. चौथ्या मजल्यावरून लिफ्ट थेट खाली कोसळली आणि लिफ्टचा दरवाजा तोडून अजित पवार हे बाहेर आले. एवढी घटना घडूनही याची भनक मीडियाला देखील लागली नव्हती परंतु अजित पवार यांनीच रात्री याबाबतची माहिती दिली आणि खतरनाक अनुभव कथन केला.  परमेश्वराचे आणि तुम्हा सगळ्या लोकांचे आशीर्वाद म्हणून मी अपघातातून वाचलो नाहीतर आज श्रद्धांजली सभाच घ्यावी लागली असती अशा शब्दात पवार यांनी या अपघाताचा अनुभव सांगितला आहे. हा बिकट प्रसंग देखील त्यांनी त्यांच्या खास आणि मिश्कील शैलीतच कथन केला.  


लिफ्टचा दरवाजा तोडून आम्ही कसेबसे बाहेर निघालो नाहीतर आज श्रद्धांजलीचाच कार्यक्रम झाला असता, या अपघाताबाबत आपण कुणालाच काही बोललो नाही, मीडियाला सुद्धा याबाबत सांगितले नाही अन्यथा लगेच ब्रेकिंग न्यूज सुरु झाली असती, तुम्ही घरची माणसं असल्यामुळे राहवले नाही म्हणून तुम्हाला ही घटना सांगितली असे बारामतीच्या कार्यक्रमात पवार यांनी सांगितले. (Opposition leader Ajit Pawar's accident, fortunately escaped) या घटनेबाबत आपण कुटुंबियांना देखील माहिती दिली नाही परंतु अपघाताचा प्रसंग बाका होता आई त्यातून आम्ही बचावलो आहे असे अजित पवार यांनी म्हटले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !