BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ जाने, २०२३

पंढरपूर तालुक्यात पैशावरून तरुणावर चाकू हल्ला !

 


शोध न्यूज :  पैशाच्या कारणावरून पंढरपूर तालुक्यात  एका तरुणावर चाकू हल्ला झाला असून पोटातच भोकसल्याने तरुण गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला आहे. 


पंढरपूर तालुका पोलिसात याबाबत फिर्याद दाखल झाली असून त्यानुसार पंढरपूर तालुक्यातील आढीव  येथील उमेश सुखदेव खाडे (वय २४) आणि आरोपी  बबलू ऊर्फ प्रतीक प्रक्षाळे यांच्यात जुन्या पैशांचा व्यवहार होता. तो व्यवहार उमेशने मिटविला होता. तरीही बबलू प्रक्षाळे हा सतत पैसे मागत होता. उमेश खाडे हे भटुंबरे येथील सोमनाथ सलगर  यांच्याबरोबर भटुंबरे येथून सोमनाथच्या गाडीवरून आढीव येथे रविवारी दुपारी  जात होते. यावेळी बबलू प्रक्षाळे याने उमेश याच्या मोबाइलवर फोन करून भटुंबरे गावातील कमानीच्या वेशीजवळ येण्यास सांगितले. त्यावेळी उमेश व मित्र सोमनाथ तेथूनच जात असताना बबलू प्रक्षाळे हा त्याचे मित्र सोमनाथ खंकाळ, सोनू माने याचा भाऊ विक्रांत माने व इतर दोन अनोळखी व्यक्‍तींनी भटुंबरे येथील कमानीजवळ त्यांना अडविले. त्यांनी रस्ता अडविताच विक्रांत माने याने उमेशला धरले व सोमनाथ खंकाळ याने जवळच पडलेला दगड उचलून पाठीत मारले. इतर दोन अनोळखी व्यक्‍तींनी उमेशच्या छातीत लाथा-बुक्क्यांनी  मारले. 


हा सगळा प्रकार सुरु असताना बबलू  प्रक्षाळे याने त्याच्या हातातील चाकूने हल्ला केला आणि हा चाकू उमेशच्या पोटात खुपसला. पोटात चाकूचा हल्ला झाल्याने  उमेशच्या पोटातून रक्‍त वाहू लागले. त्यावेळी सोमनाय हा सोडवासोडवी करत होता.  यावेळी रस्त्यावरून  जाणारे अमोल तावसकर, कृष्णा लेंगरे हे तेथेच थांबले. तसेच तेथे इतर लोकाचीही गर्दी जमली, पोटात चाकू खुपसला गेल्याने उमेश कळवळत  असताना बबलू प्रक्षाळे व त्याचे इतर साथीदारांनी पुन्हा मारहाण करून जीवे ठार मारून टाकतो, अशी धमकी दिली व तेथून सर्वजण निघून गेले. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. (Knife attack on youth in Pandharpur taluka) हल्ला आणि मारहाण करून सगळे निघून गेल्यावर  सोमनाव सलगर, कृष्णा लेंगरे, अमोल तावसकर व इतरांनी उमेशला उपजिल्हा रुग्णालयात हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले.


पंढरपूर तालुका पोलिसात या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी उमेश सुखदेव खाडे याने दिलेल्या माहितीनुसार बबलू प्रक्षाळे याच्यासह सोमनाथ खंकाळ (गजानन नगर पंढरपूर), विक्रांत माने (अंबाबाई पटांगण पंढरपूर ) आणि अन्य दोन अनोळखी व्यक्ती यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   


भीमा नदीच्या पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा काही नवीन नाही, पोलीस वाळू तस्करावर कारवाई करतात तरीही हा चोरटा वाळू व्यवसाय खुलेआम कसा सुरु राहतो असा सवाल उपस्थित होत असतो. या प्रश्नाला कुणाकडेच उत्तर नसले तरी कशामुळे हा व्यवसाय फोफावला आहे याची सर्वांनाच जाणीव असते. अवैध व्यवसायातून मिळणारा पैसा हा गुन्हेगारीकडे वळत असल्यामुळे गुन्हेगारी फोफावली जाते आणि त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होत असतो. गुन्हेगारीला देखील या पैशाची मदत होत असते. 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !