BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ जाने, २०२३

सासऱ्यासोबत पार्टी करुन जावयाने सासुलाच पळवले !

 



शोध न्यूज : सासऱ्यासोबत पार्टी केली आणि सासरा झिंगाट झाला की जावयाने सासुलाच पळऊन नेल्याची अजब आणि तोंडात बोट घालायला लावणारी एक घटना समोर आली आहे.


बदलत्या युगात प्रेमविरांचे एकेक वेगळेच किस्से रोज आजूबाजूला घडताना दिसतात. भाकरी कमवायची अक्कल नसते पण प्रेमाच्या बाता मारण्यात अनेकजण पटाईत असतात. अल्पवयीन मुलीला पळविल्याची अनेक प्रकरणे घडतात आणि हे प्रेमवीर नंतर तुरुंगात बसलेले दिसतात. प्रेमाला वय नसतं असं म्हणतात पण प्रेमालाही नात्याचे बंधन आणि मर्यादा असाव्यात अशी अपेक्षा असते पण हल्ली ही मर्यादा देखील पाळली जात नाही. पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडताना दिसतात. राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यात तर जगावेगळी पण लाजिरवाणी घटना घडली असून याची चर्चा होऊ लागली आहे.


प्रेम कधी आणि कुणासोबत होईल हे कुणाला आणि कधीच सांगता येत नाही म्हणूनच , दिल बैठा गधी पर तो परी क्या चीज है?' असं म्हटलं जातं. येथे या गध्याचे दिल गधीवर नाही तर थेट सासुवर बसले. हे प्रेम एवढे उतू गेले की सासू आणि जावई दोघे चक्क पळून गेले. तसे हे प्रेम आधीपासूनच फुलत होते पण संधी मिळाली आणि यांनी धूम ठोकली ! ४३ वर्षाची सासू आणि २७ वर्षांचा जावईबापू यांच्यातच हे सुत जुळले. सासुरवाडीचे मटण खाण्याचे निमित्त करुन जावई घरी आला. जावईबापू घरी आला म्हटल्यावर त्याचे स्वागतही दणक्यात झाले. मटण शिजत होते आणि सासरा, जावई पेगवर पेग रिचवत होते.  काही वेळाने सासरा भलताच तंगाट झाला. सासरा नशेत पेंगू लागल्याचे दिसताच सासू आणि जावई मिळून 'छू मंतर' झाले........ दुपारी चार वाजता जेंव्हा सासरा शुध्दीवर आला तेंव्हा एकूण प्रकार त्याच्या लक्षात आला. तेंव्हा मात्र सासरेबुवा चक्कर येऊन खाली कोसळले.


थोड्या वेळाने कसेबसे सावरले आणि तडक पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करुन घेतली आणि पळालेल्या सासू जावयाचा शोध सुरु केला. दरम्यान हे प्रेमप्रकरण जुनेच असल्याची माहिती समोर आली असून हे प्रकरण अविरत सुरु ठेवण्यासाठीच सासूने आपल्या मुलीचे लग्न नारायणशी लाऊन दिले असल्याचे उघड झाले. पळालेल्या सासूला तीन मुली आणि एक मुलगा आहे. (Love affair of mother-in-law and son-in-law) या चौघांचीही लग्नं झालेली आहेत तर जावयाला देखील तीन मुलं आहेत. पळून जाताना जावयाने आपल्या एका मुलीलाही सोबत नेले आहे. या प्रेमप्रकरणाची आणि पलायनाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !