BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० जाने, २०२३

राज्यातील आणखी एका नेत्याचा अपघात !



शोध न्यूज : महाराष्ट्रातील आणखी एका नेत्याचा मोठा अपघात झाला असून राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत हे कार अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. 


गेल्या काही काळापासून राज्यातील लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाचे नेते यांचे अपघात होत असून याबाबत आता उलटसुलट चर्चांना देखील सुरुवात झाली आहे. आमदार विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यानंतर पुढे अनेक नेत्यांच्या वाहनांना अपघात झाले आहेत. यात भाजपचे आमदार जयकुमार गोरे, आमदार योगेश कदम, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या वाहनाला मोठे अपघात झाल्याचे समोर आले. या अपघातांची चर्चा सुरु असतानाच आमदार बच्चू कडू हे पायी चालत जात असताना देखील त्यांना एका दुचाकीने उडवले आणि ते या अपघातात गंभीर स्वरूपी जखमी झाले. कडू यांच्या अपघातानंतर देखील नेत्यांच्या अपघाताबाबत शंका आणि संशय व्यक्त होऊ लागले आहेत त्यातच आ. कडू यांना धडक देवून बेपत्ता झालेला दुचाकीस्वार अजूनही पोलिसांना सापडत नाही त्यामुळे या चर्चेला अधिक बळ मिळू लागले आहे. त्यानंतर आज पुन्हा राज्याचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कारला अपघात झाला आहे.  


माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे आज कारमधून पालघर येथे निघाले होते. त्यांच्या कारला एका डंपरने जोराची धडक दिली असून या अपघातात सावंत हे गंभीर जखमी झाले आहेत. रुग्णवाहिकेतून त्यांना अंधेरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  काशिमिरा भागात झालेल्या या अपघातात डॉ. सावंत यांच्या मानेला आणि पाठीला मोठी दुखापत झालेली असून त्यांच्या कारचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघात केलेल्या डंपर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी वेगाने सुरु झाली आहे. 


शिवसेनेकडून दीपक सावंत यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. ते विधान परिषदेचे माजी सदस्य असून २००४ मध्ये ते पहिल्यांदा विधान परिषदेवर गेले होते. नंतर २००६ तसेच २०१२ मध्ये डॉ. सावंत पुन्हा निवडून आलेले होते. (Ex-minister of Maharashtra state seriously injured in car accident) नंतर मात्र तिसऱ्या वेळी त्यांना निवडणुकीपासून दूर राहावे लागले होते कारण त्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली नव्हती.  सन २०१४ मध्ये त्यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे राज्यमंत्री पदावर नियुक्त करण्यात आले होते आणि यावेळी उस्मानाबाद तसेच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही सावंत यांनी काम पाहिले होते. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करायला जात असताना काशिमीरा भागात त्यांच्या कारला आज हा अपघात झाला आहे.











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !