BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० जाने, २०२३

शिक्षकाने चिडवल्यामुळे अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या !

 


शोध न्यूज : शिक्षकाने चिडवल्याच्या कारणावरून एका अल्पवयीन विद्यार्थीनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली असून शिक्षकांचे वर्तन पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले आहे. 


शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील पवित्र नाते कलंकित करणाऱ्या काही घटना अलीकडे समोर येत आहेत. नुकतेच सांगोला तालुक्यातील एका शिक्षक म्हणवून घेणाऱ्या नालायक व्यक्तीने शाळेतच विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मुलीने या घटनेची माहिती दिली असताना आणि पालकांनी शाळेला जाब विचारला असतानाही तब्बल अठरा दिवसांनी याबाबत पोलिसात तक्रार झाली आणि त्यानंतर रंगेल मास्तरला बेड्या ठोकल्या गेल्या. अशा काही घटना अलीकडे उजेडात येत आहेत शिवाय शिक्षकाने दिलेल्या त्रासाने देखील अनेक विद्यार्थी शाळा सोडल्याच्या तर कुणी आत्महत्या केल्याचा घटना घडत आहेत. त्यातच आता शिक्षकाने चिडवले म्हणून एका अल्पवयीन विद्यार्थिनीने थेट गळफास घेवून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना लातूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. 


लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मयत श्रावणी नाईकनवरे मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीने प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. नववीत शिक्षण घेत असलेल्या श्रावणीने शिक्षकाच्या चिडवण्यामुळे गळफास घेवून आत्महत्या केली असल्याची तक्रार श्रावणीच्या आईने केली आहे. "कॉपिड गर्ल" म्हणून शिक्षकाने श्रावणीला चिडवले आणि यातूनच तिने गळफास घेतला आणि आपले जीवन संपवले असा आरोप श्रावणीच्या आईने केला आहे. राहत्या घरातच श्रावणीने गळफास घेत आत्महत्या केली असून या आत्महत्येस शिक्षक जबाबरदार असल्याचे आईचे म्हणणे आहे. (Minor student commits suicide due to teasing by teacher) या तक्रारीची पोलिसांनी गंभीरपणे दखल घेतली असून पोलीस याची कसून चौकशी करणार आहेत परंतु श्रावणीच्या या आत्महत्येने प्रचंड खळबळ आणि तितकीच हळहळ व्यक्त केली जात आहे. 


लातूर जिल्ह्यात मागील चार दिवसातील विद्यार्थिनीची ही दुसरी आत्महत्या आहे . प्रथम सत्राची परीक्षा केवळ दोन दिवसांवर आलेली असताना  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या साक्षी गायकवाड या विद्यार्थिनीने तीन दिवसापूर्वी गळफास घेत आत्महत्या केली होती. या विद्यार्थिनीने कुठल्या कारणासाठी आत्महत्या केली होती याचा उलगडा मात्र झालेला नाही. विद्यार्थिनीच्या या आत्महत्यामुळे मात्र पालकांत चिंता व्यक्त होऊ लागली असून याची चौकशी होण्याची मागणी वाढू लागली आहे. 



 .  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !