BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ जाने, २०२३

शिंदे गटातील आमदाराच्या गाडीला भीषण अपघात !




शोध न्यूज : लोकप्रतिनिधींच्या अपघाताबाबत चिंता व्यक्त होत असतानाच आणखी एका आमदारांचा अपघात झाला असून शिंदे गटातील आमदार योगेश कदम हे सुदैवाने या अपघातातून बचावले आहेत.


गेल्या काही काळापासून लोकप्रतिनिधींच्या वाहनांचे अपघात हा चिंतेचा विषय बनला आहे. आमदार विनायक मेटे यांचा मुंबईकडे जाताना अत्यंत भीषण अपघात झाला होता आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता, भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचा देखील भीषण अपघात अलीकडेच झाला होता आणि त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांचा अपघात झाला. लागोपाठ लोकप्रतिनिधींच्या होणाऱ्या अपघाताबाबत चिंता व्यक्त होत असतानाच शिंदे गटातील आमदार योगेश कदम यांच्या गाडीलाही मोठा अपघात झाला आहे.  शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र  योगेश कदम यांच्या कारला पोलादपूर तालुक्यातील चोळई गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला.  या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातात आमदार योगेश कदम यांना किरकोळ दुखापत झाली आहे. 


अपघाताची भीषणता मोठी असली तरी दापोलीचे आमदार योगेश कदम हे सुखरूप आहेत. त्यांच्या चालकाला देखील किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी झालेल्या चालकाला चोळई येथील शासकीय रूग्णालयात उपचाराकरीता दाखल केले आहे. योगेश कदम मुंबईच्या दिशेनं जात असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ एका भरधाव डंपरने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात कदम यांच्या वाहनाचा चक्काचूर झाला आहे. आमदार कदम हे मुंबईकडे निघाले असताना हा अपघात झाला आहे. 


आ. कदम यांच्या अपघाताबाबत घातपाताचीही शंका व्यक्त करण्यात आली.  मुंबईकडे जात असताना एका वाहनाने त्यांच्या गाडीला जोरदार धडक मारली असल्याने हा अपघात झाला परंतु ही धडक जाणीवपूर्वक दिली असण्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येऊ लागला आहे. आ. कदम यांच्या गाडीच्या पुढे आणि मागच्या बाजूस पोलिसांची वाहने होती तरीही दुसऱ्या वाहनाने कशी धडक दिली ? अशा परिस्थितीत हा अपघात झालाच कसा ? असे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या गाडीला धडक दिलेल्या वाहनाचा चालक अपघातानंतर पसार झाला आहे. धडक देणारा टँकर अपघातानंतर उलटला असल्याची देखील माहिती आहे. (Car accident of MLA from Shinde faction,Three injured) एकूण या घटनेबाबत शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त केला आहे. हा घातपाताचा प्रकार असावा असा त्यांचा संशय असून याची चौकशी करण्याची मागणी देखील ते करू लागले आहेत.  






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !