शोध न्यूज : तिरुपती बालाजी दर्शनासाठी सोलापूर येथून गेलेल्या चौघांचा कार अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात अन्य पाच जण जखमी झाले आहेत.
अपघात आणि मृत्यू अशा घटना नित्याच्याच झाल्या असून यापासून कुणी धडा घ्यायला तयार नसल्याचेच दिसत आहे त्यामुळे रोज अगणित अपघात होऊ लागले असून कित्येकांचे प्राण रोज जात आहेत. प्रत्येकाला घाई आहे आणि वेगाचे कुणालाच भान उरलेले नाही. देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या वाहनांना तर सतत अपघात होत आहेत आणि हे अपघात देखील भीषण अशा स्वरूपाचे होत असल्याचे दिसत आहे. सोलापूर येथून तिरुपती बालाजी दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या कारला असाच भीषण अपघात झाला आणि या दुर्घटनेत सोलापुरातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्यांच्या सोबतचे अन्य पाच जण गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत.
दोन दिवसांपूर्वीच जुळे सोलापूर येथून ९ जण मिळून एका कारमधून तिरुपती बालाजी दर्शनासाठी गेले होते. तिरुपती बालाजीचे दर्शन त्यांनी घेतले आणि तेथून ते कनिपमकडे निघाले होते. यावेळी अचानक रस्ता दुभाजकावर त्यांची कार आदळली. भरधाव वेगातील कार दुभाजकावर आदळल्यामुळे भीषण असा अपघात झाला आणि या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. (Accidental death of four devotees who went for darshan) चंद्रगिरी जवळील नायडूपेट पुथलापत्तू रस्त्यावर हा अपघात घडल्याची माहिती आहे. गाडीतील जखमींना तातडीने तिरुपती रुईया रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मयुर, रोहन, ऋषिकेश जंगम, अजय लुट्टे अशी मृतांची नावे सांगण्यात आली आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !