BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ डिसें, २०२२

महिला सरपंच आणि त्यांच्या पतीला लाच घेताना अटक !

 


शोध न्यूज : सरपंच महिलेलाही फुकटच्या पैशाची गोडी लागली पण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लाऊन महिला सरपंचासह त्यांच्या पतीलाही रंगेहात पकडले आणि थेट गजाआड रवानगी केली.


बदलत्या काळात महिला पुरुषांच्या बरोबरीनेच नव्हे तर कित्येकदा पुरुषांपेक्षा पुढे गेलेल्या दिसतात एवढी प्रगती महिलांनी केली आहे. भारतात पुरुष प्रधान संस्कृती असताना आता महिला रिक्षा, ट्रक, रेल्वे आणि विमानही चालवू लागल्या आहेत. महिलांनी अत्यंत कौतुकास्पद प्रगती करून 'आम्हीही काही कमी नाहीत' हे सिद्ध केले आहे. अलीकडे कुणीच महिलांना दुय्यम स्थान देत नाही आणि तसे करणे हे देखील महिलांच्या कर्तबगारीची अवमानना ठरेल. एकीकडे हे समाधानकारक चित्र दिसत असताना दुसरीकडे महिला लाचखोरीत देखील अडकताना दिसू लागल्या आहेत. शासकीय सेवेतील अनेक महिला अधिकारी, कर्मचारी चक्क लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्या आहेत.  महिलांना राजकारणात देखील आरक्षण देण्यात आले आहे. येथे काही महिला सक्षमपणे काम करतात तर काही महिलांचे पतीच लुडबुड करताना दिसतात. सरपंच बनून गावाचा कारभार महिलांच्या हाती दिला जातो पण महिला सरपंच देखील लाचखोरीत अडकते तेंव्हा सामान्य माणसाला हे धक्कादायक वाटते. 


महिलांनी राजकारणात यावे, सरपंच, नगरसेविका,आमदार, खासदार अशी पदे भुषवावीत या कल्पनेने राजकारणात महिलांना आरक्षण देण्यात आले आहे. महिला राजकारणात नेत्रदीपक आणि गौरवास्पद काम देखील करीत आहेत पण काही मोजक्या महिला मात्र अशी पदे उपभोगताना फुकटच्या पैशाच्या आहारी जाऊ लागल्याचे दु:खद चित्रही अलीकडे समोर येवू लागली आहे. चांदूर तालुक्यातील शिरजगाव बंड येथील महिला सरपंच  शिल्पा धीरज इंगळे (वय ३९) आणि त्यांचे पती धीरज रामरावजी इंगळे (वय ४३) या दोघांनीही कामाचे बिल मंजूर करण्यासाठी तीस हजाराची लाच मागितली आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात ते अडकलेही. विविध विकास कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडे ही लाच मागण्यात आली होती. 


तक्रारदाराने केलेल्या कामाचे बिल काढण्याची मागणी महिला सरपंच शिल्पा इंगळे आणि त्यांचे पती धीरज इंगळे यांच्याकडे केली होती. बिलाची ही रक्कम देण्यासाठी या दोघांनीही लाचेची मागणी केली. तक्रारदाराला ही लाच देणे मान्य नसल्यामुळे त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. या विभागाने लाच प्रकरणी पडताळणी केली आणि थेट सापळा लावला. पडताळणी कारवाईत पंचासमक्ष सरपंच शिल्पा इंगळे व त्यांचे पती धीरज इंगळे यांनी तक्रारदार यांना बिल मंजूर करण्यासाठी 30 हजार रुपये लाचेची मागणी करून ते स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर एसीबी ने सापळा लावला आणि तीस हजार रुपयांची लाच घेताना महिला सरपंच आणि त्यांचे पती रंगेहात सापडले. (Woman sarpanch and her husband arrested for accepting bribe) एसीबीने या सरपंच महिलेस आणि त्यांच्या पतीस थेट गजाच्या आड पाठवून दिले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !