शोध न्यूज : पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात घुसून राडा केल्याचा आरोप असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २८ कार्यकर्त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य देत आंदोलनाचे शस्त्र उगारत असते. प्रसंगी ही आंदोलने आक्रमक होत असतात. शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी कार्यकर्ते कायद्याची पर्वा करीत नाहीत आणि मग त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल होत असतात. अशाच प्रकारे पंढरपूर तालुक्यातील २८ कार्यकर्त्यांवर जाळपोळ, तोडफोड केल्याचे गुन्हे २०११ साली दाखल करण्यात आले होते. ऊसाला दरवाढ मिळावी म्हणून २०११ साली मोठे आंदोलन झाले होते. वाखरी गावचे हद्दीतील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यालयात घुसून लोकांनी कार्यालयातील साहित्याची तोडफोड करून तीस हजार रुपयाचे नुकसान केले होते. दोन ट्रॅक्टर पेटवून दिल्याने टायर जाळून बावीस हजाराचे नुकसान झाले होते.
कारखान्याच्या दोन कामगारांना मारहाण झालेली होती.तसेच ऊसाने भरलेल्या पंधरा ट्रॅक्टरच्या काचा टायर फोडून नऊ लाख रुपयाचे नुकसान केले होते.कार्यालयाचे आवारातील कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाच बसेसवर तसेच पांडुरंग करखान्याच्या जीपवर दगडफेक करून काचा व इतर पार्टस मोडून तोडून तीन लाख पन्नास हजाराचे नुकसान झाले होते.याबाबत शिवीगाळ मारहाण करून मोडतोड जाळपोळ करून नुकसान केलेबद्दल पांडुरंग सहकारी कारखान्याचे शेती अधिकारी रवींद्र साळुंखे यांनी पंढरपूर तालुका पोलिसात फिर्याद दिलेली होती. या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता आणि २८ जणांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
पोलिसांनी शेतकरी संघटनेचे समाधान फाटे ,तानाजी बागल,अतुल नागणे,नवनाथ नागणे,औदुंबर भोसले,सुभाष शिंदे,चंद्रकांत बागल ,बाळासाहेब जगदाळे वगैरे उपरी ,गादेगाव, वाखरी परिसरातील एकूण अठ्ठावीस लोकांविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमान्वये तपास करून गुन्हा दाखल करून त्याबाबत आरोपपत्र पंढरपूर फौजदारी न्यायालयात दाखल केले होते. (Swabhimani shetakari sanghatana Acquittal of the accused) यावर न्यायालयात सुनावणी झाली आणि सर्व कार्यकर्त्यांची मुक्तता करण्य आली. आरोपींचे वकील विजयकुमार नागटिळक यांचा युक्तिवाद ग्राहय धरून सर्वांचीच या गुन्ह्यांतून सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या निर्णयाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा दिलासा मिळाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !