BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ डिसें, २०२२

मंत्री चंदकांत पाटील शाईफेक प्रकरणी अकरा पोलिसांचे निलंबन !

 



शोध न्यूज : उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी अशा अकरा पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे.

 
भाजपचे नेते आणि राज्याच्या शिक्षणमंत्री यांच्यावर काल पुण्यातील चिंचवड येथे निषेधाची शाई फेकण्यात आली होती. चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपुरुषाच्या केलेल्या अवमानकारक विधानाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा थोर राष्ट्रपुरुषाच्या अवमानाची एक स्पर्धाच भारतीय जनता पक्षात सुरु आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी थेट राजा शिवछत्रपती यांचाच अवमान केला, भाजपचे सुधांशू त्रिवेदी, प्रसाद लाड, दानवे, आदी नेत्यांनी एका पाठोपाठ जवळपास एकसारखी विधाने केली आहेत त्यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त होत असून भाजपातून अशी विधाने नेमकी कशासाठी केली जात आहेत असा सवाल उपस्थित होत असताना मंत्री चंद्रकांत पाटील यांचेही विधान राज्यातील वातावरण संतप्त करून गेले आहे. 


राज्यात चंद्रकांत पाटील यांचा निषेध करीत त्यांना मंत्रीपदावरून हटविण्याची मागणी होत असतानाच काल चिंचवड येथे त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या घटनेने पुन्हा एकदा वातावरण ढवळून निघाले आणि समता सैनिक दल संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीच्या पिंपरी चिंचवड सचिवांना अटक करण्यात आली आहे. समता सैनिक दलाचे संघटक मनोज भास्कर घरबडे, समता सैनिक दल सदस्य धनंजय भाऊसाहेब ईचगज तसेच वंचित बहुजन आघाडी सचिव विजय धर्मा ओवाळ यांना शाईफेक प्रकरणी अटक करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून भरभक्कम कलमे लावली आहेत. त्यात भारतीय दंड संहिता कलम ३०७, ३५३, २९४, ५००,५०१, १२० ब, ३४ यासह क्रिमिनल अमेंन्डमेंन्ट ऍक्ट कलम ७ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) १३५ अशा कलमांचा समावेश करण्यात आला आहे.


शाईफेक प्रकरण पोलिसांवर देखील शेकले असून तब्बल ११ पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. यात ३ पोलीस अधिकारी आणि ८ पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. शाईफेकीची घटना घडताच पोलिसांनी लगेच विजेच्या चपळाईने हस्तक्षेप केला होता आणि शाईफेक करणाऱ्यांना तातडीने ताब्यात घेतले होते परंतु पोलिसांवर डिसेंबर महिन्यातच 'संक्रांत' आली आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (Eleven policemen suspended in Chandkant Patil throwing ink case) घडलेल्या घटनेत पोलिसांची  काही चूक नाही असे पाटील यांनीही कालंच सांगितले होते परंतु त्यांच्यावर कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे. 


 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !