BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ डिसें, २०२२

मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द , राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक होण्याची शक्यता !

 




शोध न्यूज : राजकारण वेगळ्या वळणावर जात असल्याने चिंता व्यक्त होत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला अटक होण्याचे संकेत मिळू लागले असून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर याबाबत एक ट्वीट केले आहे. 


राज्याच्या राजकारणातला गेल्या काही महिन्यांपासून वेगळीच वळणे मिळू लागली असून राज्याच्या हितापेक्षा राजकारण अधिक महत्वाचे ठरताना दिसू लागले आहे. टीकेची पातळी तर ओलांडली गेली आहेच परंतु आरोप आणि अटक अशा प्रकरणालाच अधिक महत्व दिले जात असल्याचे दिसत आहे. भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील सरकार आणि राज्यातील शिंदे फडणवीस सरकार विरोधकांना संपविण्यासाठी सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करीत असल्याची टीका विरोधक सातत्याने करीत आहेत. विरोधकावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात आणि हेच नेते भाजपात गेले की त्यांची प्रकरणे संपुष्टात येतात अशी अनेक उदाहरणे विरोधी पक्ष देत आहे शिवाय भाजपातील एकही नेत्यांची चौकशी ईडी करीत नाही असा आरोप करीत विरोधकांनी तशी यादीच जनतेसमोर ठेवली आहे. राज्यात देखील असाच प्रकार सुरु असल्याचा आरोप सातत्याने होत असताना आणि तशी प्रकरणेही समोर येत असताना आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी खासदार आनंद परांजपे हे अडचणीत येण्याची शक्यता दिसू लागली आहे. 


राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या विधानावर आधी अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले होते परंतु नंतर त्याचे रुपांतर दखलपात्र गुन्ह्यात करण्यात आले आहे. चार पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले गेले आहेत. त्यामुळे परांजपे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्याला तुम्ही चाणक्य समजत आहात, तोच तुमचा टायटॅनिक करायला कारणीभूत ठरणार आहे. तर ही आमची वैचारिक लढाई आहे. आमच्यावर ज्यांनी गुन्हे दाखल केले आहेत तेच खरे गुन्हेगार आहेत. आंदोलन करताना आम्ही काही घोषणा दिल्या. त्या असंसदीय नव्हत्या. आम्ही कोणाचीही बदनामी केली नाही" असे आनंद परांजपे म्हणाले होते.  


राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी परांजपे यांच्यावरील कारवाईबाबत एक ट्वीट केलेले असून त्यांनी परांजपे यांच्या अटकेचे संकेत दिले आहेत.  राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आणि माजी खासदार आनानाद परांजपे यांच्यावर दाखल झालेल्या अदखलपात्र गुन्ह्याचे रुपांतर एफआयआर मध्ये करण्यात आले असून आज रात्री त्यांना मुख्यालयाचे पोलीस अटक करणार अशी खात्रीलायक बातमी आपणास पोलिसांनीच दिली आहे. (NCP leader Anand Paranjpe likely to be arrested) 
आपल्या राज्याची वाटचाल आता पोलीसी राज्याकडे होऊ लागली कि काय? तर अटक कराच ! असे ट्वीट आव्हाड यांनी केले असून त्यामुळे राष्ट्रवादीच्या या नेत्याला अटक होण्याची अधिक शक्यता निर्माण झाली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !