BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ डिसें, २०२२

भुकेल्या हरिणांना माकडाने अशीही केली मदत ! VDO

 



शोध न्यूज : माकडाला मानवांचे पूर्वज मानले जाते आणि आता तर माकडाच्या आगळ्या वेगळ्या माणुसकीचे दर्शन लाखो लोक पाहू लागले आहेत. भुकेल्या हरणांच्या मदतीसाठी माकड धावून आले आणि त्याच्यात असलेल्या माणुसकीचे दर्शन घडले असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


अलीकडच्या काळात माणूस म्हणवून घेणारा प्राणीच माणुसकी विसरला आहे पण प्राणी मात्र माणुसकी जपत असल्याचे पुन्हा पुन्हा पाहायला मिळत असते. ज्यांना मुके प्राणी समजले जाते आणि माणसाला बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखले जाते पण माणसापेक्षा मुके प्राणीच अधिक बुद्धिमान आणि परोपकारी असल्याची अनेक उदाहरणे आपण पहात असतो. दुसऱ्या जीवासाठी प्राण्यात प्रचंड प्रेम असते आणि ते आपल्या पद्धतीने व्यक्त देखील करीत असतात. त्यांचे हे प्रेम समजण्याएवढे शहाणपण माणसातच नसते. सर्व जातीच्या प्राण्यात हे प्रेम ठासून भरलेले दिसते. या प्राण्यांना जीव लावला तर ते माणसांसाठी आपला जीव देखील देतात. याची साक्ष देणाऱ्या अनेक घटना घडल्याही आहेत. माणूस मात्र आपणच खरे विद्वान आहोत अशा भ्रमात राहतो आणि त्याच्याजवळच माणुसकी नाही याचे प्रदर्शन तो पुन्हा पुन्हा करीत असतो. 


माकडापासून माणसांची उत्पत्ती झाली आहे पण हाच माणूस माकडाची अवहेलना करीत असतो. कुणी काही विचित्र केले तर त्याला 'माकडचेष्टा'  म्हणून हिणवत असतो. प्रत्यक्षात माकड हे माणसापेक्षा 'शहाणे' असल्याचा अनुभव येत असतो. सद्या सोशल मीडियावरून एक व्हिडीओ व्हायरल होत असून माकडाची माणुसकी या व्हिडीओमधून पुन्हा पाहायला मिळू लागली आहे. दारात आलेल्या कुत्र्याला अन्न देण्याची माणसाची तयारी नसते. माकडाने मात्र हरणाची भूक जाणली आणि या भुकेल्या हरणाला कशी मदत केली याचे दर्शन देणारा हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण थक्क होत आहे. 


भुकेली हरणे झाडाजवळ येतात, त्यांना झाडाची पाने खाऊन भूक भागवायची आहे पण झाड उंच असल्याने झाडांची पाने त्यांच्या तोंडाला येत नाहीत.  त्याच झाडावर असलेले माकड हरणांची ही अवस्था पाहते आणि त्याला दया येते. झाडावरील माकड वेगाने एका फांदीवरून खाली येते. झाडाची फांदी आपल्या वजनाने खाली खेचून ठेवते आणि हरीण या झाडांची पाने खाऊ लागते. (Monkey helps hungry deer, viral video) हरणांची भूक भागविण्यासाठी माकडाची प्रेमळ धावपळ या व्हिडीओमध्ये अगदी स्पष्ट पाहायला मिळते. तुम्हीही पहा माणसालाही माणुसकी शिकविणारा हा व्हिडीओ ! 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !