BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ डिसें, २०२२

जीपचालकाने भडकावली वाहतूक पोलिसाच्या श्रीमुखात !

 


शोध न्यूज : वाहतूक पोलिसांवर आता जीपचालक देखील हात उचलू लागले असून मंगळवेढा येथील एका वाहतूक पोलिसाच्या गालात मारल्याप्रकरणी एका चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


वाहतूक पोलीस आणि वाहनचालक यांच्यात सतत खटके उडताना दिसत असतात. वाहनचालक नियमाचे पालन करीत नाहीत आणि वाहतूक पोलिसांनी रोखले की त्यांच्याशी हुज्जत घालत बसतात. हा वाद कधीकधी एवढा विकोपाला जातो की पोलीस आणि वाहनचालक यांच्यात जोरदार हमरीतुमरी होत असते. असे प्रसंग अनेकदा भर रस्त्यावर पाहायला मिळतात. अशा प्रकरणात कधी पोलिसाचा अडेलपणा असतो तर कधी वाहन चालकाची मस्ती कारणीभूत ठरते. मंगळवेढा तालुक्यात तर याच्याही पुढे जाऊन एक घटना घडली असून याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 


मंगळवेढा - मरवडे रस्त्यावर वाहतूक नियंत्रणाचे काम करीत असलेल्या वाहतूक शाखेच्या सत्यवान शिंदे या पोलीस कर्मचाऱ्याने जीपचालक संतोष लक्ष्मण राठोड याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलीस कर्मचारी हे आपले सरकारी काम करीत असताना रिलायंस पेट्रोल पंपाजवळ कार्यरत होते. तेथे मरवडे गावाकडून मंगलवेढ्याच्या दिशेने एक जीप जाताना त्यांना दिसली. या जीपचा क्रमांक स्पष्ट दिसत नव्हता त्यामुळे पोलीस कर्मचारी शिंदे यांनी चालकाला इशारा करून क्लुजर जीप थांबवली. ही गाडी थांबतच चालक संतोष लक्ष्मण राठोड (बालाजी नगर, मंगळवेढा) हा खाली उतरला. 


गाडीच्या समोरच्या बाजूचा वाहन क्रमांक स्पष्ट दिसत नाही त्यामुळे दंडात्मक कारवाई करावी लागेल असे शिंदे या चालकास म्हणाले. त्यासाठी गाडी बाजूला घेण्यास सांगितले असता चालक राठोड यांनी कारवाईला विरोध दर्शवला. मी आजवर कधीच दंड भरलेला नाही आणि आताही दंडाची कारवाई करू देणार नाही असे म्हणत त्याने पोलीस कर्मचारी शिंदे यांचं डाव्या गालावर चापट मारली. पोलीस कर्मचारी शासकीय गणवेशात असतानाची राठोड याने मारहाण केलीच शिवाय मशीनचीही तोडफोड केली. या घटनेत दहा हजार रुपयांचे नुकसान झाले अशा आशयाची फिर्याद पोलीस कर्मचारी शिंदे यांनी दिली आहे. 


सदर फिर्यादीवरून पोलिसांनी राठोड याच्याविरोधात अंगावर धावून येत शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (The jeep driver assaulted the traffic police) कर्तव्यावरील पोलिसाच्या अंगावर हात उचलण्यापर्यंत मजल गेल्याने या घटनेची चर्चा होऊ लागली  आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !