BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ डिसें, २०२२

सुनेवर अत्याचार करणारा सासरा बाराच्या भावात !

 


शोध न्यूज : आपल्या सुनेवरच अत्याचार करणारा सासरा बाराच्या भावात गेला असून पंढरपूर सत्र न्यायालयाने त्याला दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.


अलीकडे समाजात नैतिकता आणि नात्यातील पावित्र्यही नष्ट होताना दिसत असून लेकीसारख्या असलेल्या सुनेवर देखील सासरा अत्याचार करीत असलेल्या घटना अधूनमधून समोर येत असतात. पंढरपूर येथील एक घटना न्यायालयात देखील सिद्ध झाली असून न्यायालयाने सासऱ्याला दहा वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सुनेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले आणि वर तिलाच धमकी दिली. सून घरात एकटी असताना पंढरपूर येथील महादेव बनसोडे याने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगू नको अन्यथा तुझे जगणे अवघड होईल अशा प्रकारची धमकी देखील त्याने सुनेला दिली. असा अनैतिक प्रकार एकदा नव्हे तर वारंवार घडू लागला त्यामुळे सुनेने अखेर पोलीस ठाणे गाठले आणि सासरा करीत असलेल्या अत्याचाराची तक्रार दिली. 


या खटल्याची सुनावणी पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयात झाली आणि आरोपीला दोषी मानून विविध कलमानुसार त्याला शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात ७ जणांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. (Daughter-in-law tortured, father-in-law sentenced to ten years) न्यायालयाने प्रत्येक कलमानुसार दहा वर्षे सक्तमजुरी आणि धमकी दिल्याप्रकरणी दंड अशी शिक्षा सुनावली. 



  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !