BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ नोव्हें, २०२३

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती ढासळली, डॉक्टरांनी दिली माहिती !

 



शोध न्यूज : राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती अधिकच बिघडली असून त्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्या आहेत तसेच त्यांचा ताप १०१ वर पोहोचला असल्याचे, त्यांच्यावर उपचार करीत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले आहे. 


राज्यात  मराठा आंदोलनाची आग पेटली आहे परंतु अजित पवार हे मात्र कुठेच दिसत नाहीत. एकीकडे मराठा आरक्षण आंदोलन भडकत असतानाच अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली आणि त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. अजित पवार यांना १०१ एवढा ताप असल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर संजय काकोटे यांनी दिली आहे. अजितदादा यांच्या एकूण प्रकृतीबाबतची माहितीच डॉक्टरांनी दिली आहे. अजित पवार हे सद्या घरीच उपचार घेत असले तरी, प्लेटलेटबाबतची महत्वाची चाचणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. ताप वाढलेला असून पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी झाले आहे. मोठ्या प्रमाणात त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याची  माहिती देखील डॉक्टरांनी दिली आहे. पाच दिवसांपूर्वी त्यांना डेंग्यूची लागण झाली आहे त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली आहे.


अजितदादांच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी होत चालेल्या असून त्या ८८ हजारावर आलेल्या आहेत. त्यांना सद्या विश्रांतीची आवश्यकता असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरु आहेत. (Deputy Chief Minister Ajit Pawar's health deteriorated ) प्लेटलेट्स तपासणीत काही  वेगळे आढळून आल्यास, अजित पवार यांनी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घ्यावा लागेल असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !