BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ डिसें, २०२२

पंढरपूर तालुक्यातील महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण !

 



शोध न्यूज : पंढरपूर तालुक्यातील एका महाविद्यालयीन मुलीला पळवून नेल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पंढरपूर तालुक्यात खळबळ उडवून दिली आहे. 


मागील काही वर्षांपासून मुली पळून जाण्याचे आणि पळवून नेण्याचे प्रकार वाढीला लागले असून ग्रामीण भागातील मुलींच्या बाबतीत देखील अशा घटना घडताना दिसत आहे त्यामुळे पालकात चिंता व्यक्त होत असतानाच आता आणखी एक घटना समोर आली आहे. पंढरपूर तालुक्यातील एका गावातील एक मुलगी पंढरपूर येथे परीक्षा देण्यासाठी आली होती. पंढरपूर येथील एका नामांकित महाविद्यालयात बारावी इयत्तेत ही तरुणी शिकत होती. या तरुणीची परीक्षा असल्याने ती परीक्षा देण्यासाठी तालुक्यातील गावातून पंढरपूर येथे आली होती. वडिलांनी तिची काळजी घेत तिला परीक्षेसाठी स्वत: आणून महाविद्यालयात सोडले होते. परीक्षा देण्यासाठी सदर मुलगी महाविद्यालयात गेली. परीक्षा झाल्यानंतर मुलीला परत सोबत घेवून जाण्यासाठी तिचे वडील पंढरपूर येथेच थांबून राहिले. 


परीक्षा संपण्याच्या वेळेस दुपारी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास वडील पुन्हा या मुलीला घेण्यासाठी म्हणून महाविद्यालयाकडे आले परंतु मुलगी मिळालीच नाही. परीक्षा देण्यासाठी गेलेली मुलगी परीक्षा झाल्यानंतर आढळून आली नसल्याचे तिचा शोध घेण्यात आला. शोधूनही मुलगी सापडत नसल्याने चिंताक्रांत झालेल्या पित्याने पोलीस ठाणे गाठले आणि आपली फिर्याद दिली. मागील काही घटनांचा संदर्भ देत पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मुलीचे वय १७ वर्षे ११ महिने एवढे आहे. सांगली जिल्ह्यातील भिवघाट येथील गणेश केंगार या तरुणाने सदर मुलीला यापूर्वी असेच बाहेर नेलेले होते. 


सदर मुलीला केंगार याने यापूर्वी नेले होते तेंव्हा पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे येथील सोमनाथ पडळकर याने या मुलीच्या मोबाईलवर काही मेसेज केलेले होते. यावेळी भटुंबरे (गुरसाळे रोड) येथील अन्य दोघांनी यावेळी त्यांना सहकार्य केलेले होते असे या फिर्यादीत नमूद करण्यात आलेले आहे. (Kidnapping of college girl in Pandharpur taluka) त्यानुसार पोलिसांनी भिवघाट येथील गणेश केंगार, भटुंबरे येथील सोमनाथ दिलीप  पडळकर, आबा जगन्नाथ कारंडे, महेश खांडेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !