धाड धाड करीत संपूर्ण मालगाडी अंगावरून गेली आणि त्यानंतर तो उठला आणि आपल्या कामाला निघून गेला. या घटनेचा एक व्हीडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अलीकडे सोशल मीडियावरून एकापेक्षा एक धक्कादायक आणि सत्य घटनेचे व्हिडीओ व्हायरल होत असतात आणि मोठ्या प्रमाणात ते पाहिलेही जातात. पूर्वी अनेक विस्मयकारक घटना ऐकायला आणि वाचायला मिळायच्या परंतु त्याचे व्हिडीओ उपलब्ध नसायचे. आता मात्र बहुतेक सर्व घटनांचे थरारक आणि धक्कादायक व्हिडीओ पाहायला मिळतात. ऐकीव घटनेवर माणूस सहसा विश्वास ठेवत नाही परंतु व्हिडीओमुळे जगात घडलेल्या विस्मयकारक घटना प्रत्यक्ष पाहायला मिळू लागल्या आहेत आणि मोठ्या कुतूहलाने जगभर असे व्हिडीओ पहिले जात आहेत. अधिक विस्मयकारक व्हिडीओ लाखोंच्या संख्येने पहिले जात असतात. आता आणखी एक असाच व्हिडीओ व्हायरल होत असून अंगावर काटा आणणारी ही घटना चित्रित झाली आहे.
'देव तरी त्याला कोण मारी'? अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. दुनियेत अशा अनेक घटना घडतात की यावेळी ही म्हण वापरली जाते. मृत्युच्या अगदी जवळ जाऊन देखील माणसांचा जीव वाचला असल्याच्या अनेक घटना घडतात आणि त्याचे व्हिडीओ व्हायरल होतात. एवढ्या मोठ्या संकटातून हा माणूस वाचलाच कसा ? असा प्रश्न अशा घटनातून उपस्थित होतो. अशी काही संकटे येतात की यातून माणूस वाचू शकतच नाही अशी खात्री असते आणि नेमके अशा संकटातून माणूस सहीसलामत बचावतो. कित्येक अपघातात असे प्रसंग घडतात आणि 'देव तरी त्याला कोण मारी?' या म्हणीचा वापर होतो. केवळ परमेश्वरानेच माणसाला वाचवले अशी भावना निर्माण होत असते. त्याशिवाय दुसरे काहीच उत्तर माणसाजवळ शिल्लक उरलेले नसते. अशाच प्रकारचा आणखी एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ पहात आहेत.
मोठ्या शहरात रेल्वेचे जाळेही मोठे असते आणि शहरातील माणूस हा नेहमीच प्रचंड धावपळीत असतो. मनाई आणि धोका असतानाही तो घाईघाईत रेल्वेचे रूळ ओलांडत असतो. अशा वेळी रेल्वेखाली चिरडण्याचा धोका असतो. असाच एक व्यक्ती घाईघाईने निघालेला असताना तो रूळ ओलांडण्याचे धाडस करीत आहे. उभ्या मालगाडीच्या खालून तो रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करतो. मालगाडीच्या खालून तो पलीकडे जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच रेल्वे सुरु होते. त्यामुळे त्याला गाडीच्या खालून बाहेर निघणे अशक्य होते. तो रेल्वेखाली जाताच रेल्वे सुरु झाल्याने त्याची पंचाईत होते. पुढे जाता येईना आणि मागेही येत येईना अशी त्याची अवस्था होते.
रेल्वे मालगाडीच्या खाली तो दोन रुळांच्या मध्ये पालथा झोपतो आणि अख्खी रेल्वे त्याच्या अंगावरून जाते. आजूबाजूचे लोक घाबरून पाहतात. संपूर्ण रेल्वे अंगावरून जाते आणि त्यानंतर ही व्यक्ती उठते आणि आपल्या कामाला निघून जाते. (Viral Video: The train ran over him but he was alive) तोपर्यंत ही घटना पाहणाऱ्याचा श्वास कोंडलेला असतो. त्याला पाहून पुन्हा लोक म्हणतात, 'देव तरी त्याला कोण मारी?' तुम्हीही पहा हा व्हिडीओ ... (व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लाईनवर क्लिक करा.)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !