BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० नोव्हें, २०२२

महाराष्ट्र राज्य सरकार अस्थिर होण्याचा योग असल्याची भविष्यवाणी !

 



शोध न्यूज : राज्यातील सरकार टिकेल की नाही याबाबत मतमतांतरे व्यक्त होत असतानाच हे सरकार अस्थिर होण्याचा योग असल्याची भविष्यवाणी ज्योतिषाचार्यानी केली आहे. 


शिवसेना फोडून चाळीस आमदार बाहेर पडले आणि राज्यात भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली परंतु पहिल्या दिवसांपासून या शिंदे फडणवीस सरकारबाबत भाकिते व्यक्त होऊ लागली आहेत. बऱ्याच कुरघोड्या आणि नाट्यमय घटना झाल्यानंतर हे सरकार सत्तेत आले आहे पण या सरकारचे भवितव्य सर्वोच्च न्यायाल्यालाच्या निर्णयावर अवलंबून आहे. न्यायालयाच्या निर्णयातून हे सरकार कोसळेल असे घटनातज्ञ सांगत असताना राज्यात रोजच वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. पन्नास खोके हा तर राज्यात कळीचा मुद्दा बनला असून राज्यातील मोठे प्रकल्प राज्याचे बाहेर जात असल्याने महाराष्ट्रातील जनता नाराज आणि अस्वस्थ आहे. शिंदे गटातील मंत्री, आमदार यांच्या वक्तव्याने सरकार अडचणीत येत आहे आणि यातच ज्योतिषाचार्यानी मोठे भाकीत केले आहे. यावर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा विषय आहे पण राज्यात नव्या चर्चेला मात्र विषय मिळाला आहे.


राज्यात लवकरच राजकीय अस्थिरता येणार असल्याचे ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे यांनी सांगितल्यामुळे राजकिय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार याची चर्चा आधीच सुरु झाली असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर आपल्या कार्यकर्त्यांना याबाबत स्पष्ट आदेशाच दिले आहेत आणि आता हे भाकीत समोर आले आहे. धारणे यांनी ग्रहणाच्या परिस्थितीमुळे राज्यातील राजकारणात ही परिस्थिती निर्माण होणार असल्याचे म्हटले आहे. ज्योतिषावर विश्वास न ठेवणाऱ्या जनतेची संख्या मोठी असली तरी विश्वास ठेवणारे नागरिक देखील मोठे आहेत. राजकीय व्यक्ती तर अशा गोष्टीवर अधिक विश्वास ठेवतात हे त्यांच्या कृतीवरून वेळोवेळी दिसून येते. निवडणुकीत विजय मिळावा म्हणून बहुतेक उमेदवार पूजापाठ आणि नवस करीत असल्याचे दिसत असते. त्यामुळे या मंडळींचा अशा बाबीवर विश्वास अधिक असणे स्वाभाविक असते. 


राज्याची परिस्थिती गेल्या चार महिन्यांपासून अस्थिर असल्याचे मानले जात असून हे सरकार पडणार असल्याचे राजकीय भाकीत व्यक्त होत आहेच पण आता ज्योतिषी देखील असे भाकीत व्यक्त करू लागले आहेत. पंधरा दिवसांच्या अंतराने आलेल्या सूर्य आणि चंद्र यांच्या ग्रहणामुळे राज्यात राजकीय अस्थिरता येईल असे स्पष्ट भाकीत ज्योतिषाचार्य नरेंद्र धरणे यांनी केले आहे. अशाच प्रकारे पंधरा दिवसांच्या अंतराने २९ वर्षांपूर्वी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण आले होते आणि त्यावेळी केंद्र सरकार अस्थिर झाले होते याचा संदर्भ देखील देण्यात आला आहे. यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होतात की काय ? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर या सरकारचे भवितव्य अवलंबून असून न्यायाल्यालाचा निर्णय जर सरकार च्या विरोधात गेला तर सरकार कोसळणार आणि पुन्हा निवडणुका घेण्याची परिस्थिती निर्माण होणार असल्याचे मत राजकीय वर्तुळातून आधीपासूनच व्यक्त होत आहे. 


पंधरा दिवसांच्या अंतराने सूर्य आणि चंद ग्रहणामुळे राजकीय अस्थिरतेची परिस्थिती आली असून आगामी चाळीस ते पन्नास दिवसात राज्याच्या राजकारणातील ही अस्थिरता अधिकच वाढणार आहे. अशीच परिस्थिती २९ वर्षांपूर्वी आलेली होती आणि यावेळी केंद्रातील सरकार अस्थिर झालेले होते. (Maharashtra State Government likely to become unstable) तशीच घटना घडण्याचे योग महाराष्ट्रात आता दिसत आहेत असे भाकीत धारणे यांनी केले आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुकांची चर्चा सुरु झाली आहे. 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !