BREAKING NEWS
सोलापूर : फरशी घेवून निघालेल्या ट्रकला जोरदार धडक बसल्याने सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
फरशी घेवून वागदरीवरून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या एका ट्रकला भरधाव वेगातील इंडिका कार समोरून धडकली असून या अपघातात एका लहान मुलासह तिघांचा मृत्यू झाला आहे. अक्कलकोट तालुक्यातील शिरवळजवळ हा अपघात झाला असून मृतात दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवली जात असून मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. ट्रकला वेगवान इंडिका कारने समोरून धडक दिली असून प्रचंड वेगामुळे हा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे . इंडिका कारचा वेग अधिक होता त्यामुळे रस्ता रुंद असतानाही कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही कार सरळ फरशी घेवून निघालेल्या ट्रकला समोरच्या बाजूने जोरात धडकली आहे. ही धडक अंत्यंत वेगात झाली असल्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अविश्रांतपणे करण्यात आलेले ड्रायविंग आणि अधिकचा वेग हेच या अपघाताचे कारण असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला आहे. अपघात होताच अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोळी आणि अन्य कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Three died in a terrible accident in Solapur district) पोलीस आणि नागरिक मदतकार्य करीत असून पोलीस या अपघाताबाबत अधिक माहिती घेत आहेत. तिघांचा मात्र घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !