BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ नोव्हें, २०२२

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचे केले मुंडण !

 



आपल्या पत्नीकडे परपुरुषाने पाहू नये म्हणून सोलापुरातील एका पतीने तरुण पत्नीचे मुंडण केले असून तीन महिन्यांनी ही बाब उघडकीस येताच पतीसह अन्य कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महिलाविषयक कायदे कितीही कडक असले तरी महिलांचा वेगवेगळ्या प्रकारे छळ होतच आहे. सोलापुरात तर एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पैशासाठी तर विवाहित महिलेचा अतोनात छळ केलाच परंतु परपुरुषाची नजर पत्नीकडे जाऊ नये म्हणून तरुण पत्नीचे मुंडण केले. ही अमानवी छळाची बाब देखील तब्बल तीन महिन्यांनी उघडकीस आली आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयाचे भूत नेहमीच भयंकर असते पण सोलापुरात एका विवाहितेचा अनन्वित छळ झाल्याचे उघडकीस आले आहे. आपल्या पत्नीने परपुरुषाकडे पाहू नये आणि पर पुरुषाने आपल्या पत्नीकडे पाहू नये या विचाराने या नवऱ्याने पत्नीचे टक्कल केले होते. या प्रकारचा छळ करूनही याची माहिती अन्य कुणालाच नव्हती.


पिडीत महिलेचे लग्न सोलापूर येथील जोडबसवन्ना चोकातील कलीम चौधरी याच्याशी मे महिन्यातच झाले होते. लग्न झाल्यानंतर काही दिवसांत कलीम आपल्या पत्नीवर संशय घेऊ लागला. घरातील सागेले कामाच्या निमित्ताने घराबाहेर जायचे आणि कलीम याला आपल्या पत्नीच्या चारित्र्याबाबत संशय यायचा. अखेर त्याने 'मला तुझे केस आवडत नाहत' असे म्हणत तिला केस कापून टाकायला सांगितले. पत्नीने याला नकार दिला तेंव्हा तो चिडला आणि त्याने पत्नीशी बोलणे बंद तर केलेच पण या कारणावरून मारहाण देखील सुरु केली. अखेर पत्नीने त्रासाला कंटाळून होकार दिला आणि कलीम याने नाभिक घरी बोलावून पत्नीचे टक्कल केले. सदर महिलेने मात्र याबाबतही आपल्या माहेरी काहीच सांगितले नाही. 


एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सदर पिडीत माहेरी गेल्यावर तिने आपल्या माहेरी या प्रकारची कल्पना दिली. पाच लाखांची मागणी करीत असल्याबाबत देखील तिने माहिती सांगितली. दरम्यान माहेरी सोडलेल्या पिडीत महिलेस सासरी घेवून जायला कोणीच येत नाही हे लक्षात आले. तिच्या सासरच्या लोकांनी फोन घेणे देखील बंद केले. हुंड्यासाठी त्रास होत असल्याची तक्रार देण्यासाठी पीडिता आणि तिच्या माहेरची मंडळी पोलीस ठाण्यात दाखल झाली आणि यावेळी पिडीत महिलेचे टक्कल तीन महिन्यांपूर्वी करण्यात आले होते ही बाब समोर आली. पोलिसांनी सगळी विचारपूस करताना हा प्रकार समोर आला. (The hair of the married woman was cut due to suspicion of character) पोलिसांनी महिलेचा पती कलीम चौधरी आणि सासू सासऱ्याच्या विरोधात विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  


   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !