शोध न्यूज : नवी पिढी घडविण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे अशा एका शिक्षकाने मुख्याध्यापक आणि अन्य शिक्षकांसमोरच विनयभंग केला असल्याची तक्रार एका शिक्षिकेनेच केल्याने शिक्षण विभागात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
सद्वर्तनाचे धडे देवून नवी पिढी घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षक मंडळीवर असते आणि अनेक शिक्षक ही जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत असतात. समाजातील सर्व घटकांपेक्षा शिक्षकाकडे आजही मोठ्या आदराने पहिले जाते. या आदर आणि सन्मानास पात्र असणारे बहुसंख्य शिक्षक आजही विविध शाळामधून आढळत असतात. काही मोजके शिक्षक मात्र या पवित्र क्षेत्राला बदनाम करण्यासाठीच जन्माला आलेले असतात. दारू पिऊन शाळेत आडवे झालेल्या अनेक शिक्षकांचे व्हिडीओ समाज मध्यमावरून व्हायरल होत असतात तर काही शिक्षक शाळेपेक्षा राजकारणात अधिक रस घेताना दिसतात त्यामुळे शिक्षणाच्या पावित्र्याला धक्का लागताना देखील दिसत असतो. शिवाय शिक्षणासाठी आपले आयुष्य चंदनासारखे झिजवत असलेल्या सज्जन शिक्षकांना देखील या मुठभर लोकांमुळे मान खाली घालण्याची वेळ येते. आज तर एका शिक्षिकेनेच दुसऱ्या एका शिक्षकावर विनयभंग केल्याची तक्रार केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील कुमठा नाका परिसरातील एका शाळेत शिक्षिका असलेल्या एका शिक्षिकेने एका शिक्षाच्या विरोधात ही गंभीर तक्रार केली असून हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे. विशेष म्हणजे शाळेच्या बैठकीवेळी मुख्याध्यापक आणि अन्य शिक्षक उपस्थित असताना या शिक्षकाने एका शिक्षिकेचा हात धरला असल्याची ही तक्रार असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात शिक्षका विरोधात विनयभंग आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर शिक्षक आणि पिडीत शिक्षिका एकाच शाळेत कार्यरत आहेत. या शिक्षकाने टोमणे मारत 'येथे चोर काम करीत आहेत' असे म्हटल्याची तक्रार शिक्षिकेने मुख्याध्यापक यांच्याकडे केली होती. या तक्रारीवरून मुख्याध्यापक यांनी बैठक बोलावली असताना या बैठकीतच गैरप्रकार घडला असल्याची ही तक्रार आहे.
मुख्याध्यापक यांनी बोलावलेल्या बैठकीत सदर शिक्षिकेने आपली तक्रार सांगत असताना या शिक्षकाने बैठकीतच आपल्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली, शिवीगाळ करताना जातीवाचक शब्द वापरले. शिक्षिकेचे हात पकडून जवळ ओढले आणि हात मुरगाळले, शिवाय बैठकीतील अन्य शिक्षकांना देखील धक्काबुक्की केली. मुख्याध्यापक आणि अन्य शिक्षकांच्या डोळ्यादेखत आपल्याला लज्जा वाटेल अशा पद्धतीने या शिक्षकाने कृत्य केले असल्याची फिर्याद सदर शिक्षिकेने पोलिसात दिली.
पिडीत शिक्षेकेने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी त्याच शाळेतील या शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Teacher molestation, A case filed against the teacher) शाळेतील बैठकीत मुख्याध्यापक आणि अन्य शिक्षक यांच्यासमोरच हा प्रकार घडला असल्याची तक्रार देण्यात आल्याने सोलापूर जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !