BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ नोव्हें, २०२२

बाप रे बाप ! फेकून मारलेली चप्पल घेवून पळाला साप ! VDO



साप म्हटलं की तो बेडूक, उंदीर यांना घेवून पळताना आपण अनेकदा पाहिलेला असतो पण सापाला मारलेली चप्पल घेवून साप पळाला असल्याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून लाखो लोक तो पाहू लागले आहेत.

साप दिसला की त्याला लोक काठीने मारतात, अलीकडे अनेकजण साप दिसला की सर्पमित्राला बोलावतात आणि त्याच्या मार्फत सापाला पकडून मग सर्पमित्र हा साप दूर जंगलात नेऊन सोडतात. अलीकडे साप, नाग देखील माणसांच्या जगात वावरताना दिसत आहेत आणि त्यांचे वेगवेगळे तसेच धक्कादायक व्हिडीओ देखील पाहायला मिळत असतात. साप, नाग अलीकडे लोकांच्या घरात घुसून आरामात राहू लागले आहेत. काही साप दारात उभ्या केलेल्या दुचाकीच्या आश्रयाला आलेले दिसतात. दुचाकी वाहनांच्या आतल्या बाजूला विषारी नागाने  आश्रय घेतल्याचे काही व्हिडीओ देखील व्हायरल झालेले आहेत. हे विषारी प्राणी कुठे दडून बसलेले असतील याचा काहीच अंदाज येत नाही. दारात सोडलेल्या बुटात एका विषारी नागाने आश्रय घेतला असल्याचा एक व्हिडीओ देखील प्रचंड व्हायरल झाला होता. आता मात्र सापाचा असाच एक पण अत्यंत वेगळा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.


साप म्हटलं की अनेकांची घाबरगुंडी उडते आणि  मग प्रत्येकाची वेगळी तऱ्हा पाहायला मिळते. सापाला पाहून कुणी दूर पळून जाते तर कुणी त्याच्या दिशेने काही फेकते. सापाने बेडूक अथवा उंदीर गिळलेला असल्याचे अनेकवेळा पाहायला मिळत असते. कधी कधी साप अथवा नाग तोंडात उंदीर पकडून बिळाच्या दिशेने पळताना देखील पाहायला मिळत असतात. हे सामान्य देखील आहे पण सापाला कुणी काही फेकून मारले आणि ही वस्तू घेवून साप पळाला असल्याचे कधी ऐकिवात नसते आणि पाहण्यात देखील नाही. एरवी कुणी असे काही सांगितले तर त्याच्यावर कुणी विश्वास देखील ठेवणार नाही. मात्र प्रत्यक्षात अशी घडलेली घटना चित्रित झाली असून याचा एक व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेटकरी मोठ्या कौतुकाने पहात आहेत.


लोक रहात असलेल्या भागत एका भल्या मोठ्या सापाचे आगमन होते, साहजिकच लोकांनी हा साप पाहिल्यावर गोंधळ उडतो. लांब लचक साप पाहून अनेकांची भंबेरी उडतेच पण अनेकांना काय करावे हेच कळत नाही. एकाने सापाच्या दिशेने एक चप्पल फेकून मारली आहे. या भीतीने साप पळून जाईल असे वाटले पण घडले वेगळेच ! साप पळू लागला पण एकटा नाही, त्याला फेकून मारलेली चप्पल त्याने तोंडात पकडली आणि चप्पल घेवूनच तो पळू लागला. कधी न घडणारा प्रकार पाहून सगळेच अवाक होवून पहात राहिले. या घटनेचे चित्रण एकाने केले आहे. (Viral video, snake ran away with the thrown slipper)  हाच व्हिडीओ वेगाने व्हायरल होऊ लागला असून पहिल्यांदाच असा व्हिडीओ समोर आला आहे. तुम्हीही पहा हा व्हिडीओ !  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !