BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ नोव्हें, २०२२

सोलापूर जिल्ह्यातील दूध दर राज्यात सर्वाधिक !



शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यात दुधाला राज्यात सर्वाधिक दर दिला जात असल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी आज पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील एका कार्यक्रमात दिली आहे.  


राज्यात फक्त सोलापूर जिल्ह्यातच दुधाला जास्त दर दिला जात आहे. जिल्हा दूध संघाने चांगला दर दिल्यामुळेच बाजारातील दुधाचे दर टिकून राहिले आहेत. सोलापूर जिल्हा दूध संघ पुन्हा एकदा नव्याने उभारी घेत आहे. संघानेही मागेल त्याला दूध डेअरी देण्याचे धोरण स्वीकारले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनीही जिल्हा दूध संघाला दूध देऊन सहकार्य करावे, अशी विनंती जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी केली. खेडभोसे (ता. पंढरपूर) येथे श्री. दत्त दुध संकलन व शितकरण केंद्राच्या अकराव्या  वर्धापनदिनानिमित्त दुध उत्पादक सभासदांना भेटवस्तूंचे  वाटप  करण्यात आले. या कार्यक्रमात शिंदे बोलत होते.यावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश पाटील, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक समाधान काळे, विठ्ठलराव शिंदे सह. साखर कारखान्याचे संचालक पोपट चव्हाण, दीपगंगा ग्रुपचे अजय फराडे, डॉ. अमोल महाजन, सरपंच सज्जन लोंढे बंडू पवार उपस्थित होते.


नूतन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यापासून म्हणजे मार्च महिन्यापासून दूध संघाने वेळेवर दूध पेमेंट केलेले आहे.  सध्या 52 हजार दैनंदिन संकलन असलेला संघ येत्या 2 - 3 महिन्यात 1 लाख लिटर दैनंदिन संकलन करण्याचा प्रयत्न आहे. पंढरपूर तालुक्यातील 42 गावापैकी सर्वात जास्त 50 लाख रुपयांचा निधी आमदार बबनदादांच्या माध्यमातून 25 - 15 योजनेमधून खेडभोसे गावास दिलेले आहेत. दडगळे मळ्यातील अर्धा कि. मी. रस्त्याचे राहिलेला आहे. त्याचे ही काम पुढील काळात शंभर टक्के केले जाईल. तसेच इतरही रस्त्याच्या समस्या पूर्ण केल्या जातील. त्याचबरोबर व्यायाम शाळेसाठी निधी मंजूर केला जाईल, अशी ग्वाही यावेळी बोलताना शिंदे यांनी दिली.


गणेश पाटील यांनी यावेळी बोलताना  'सिध्देश्वर पवार यांनी केवळ दूध संकलन न करता प्रामाणिकपणे काम करत शेतकऱ्यांशी वेगळ्या पद्धतीने नाते जोडले आहे. दुधाला चांगला दर दिला आहे. त्यांनी भविष्यात शेतकऱ्यांशी  निगडित उद्योग सुरू करावेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होत असताना याठिकाणी दूध प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी गणेश पाटील यांची निवड झाल्याबद्दल खेडभोसे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह  शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच खेडभोसे विद्यालयाचे संस्थापक सचिव तानाजी पवार यांना मान्यवरांच्या हस्ते "खेडभोसे भूषण" पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.


या कार्यक्रमासाठी उपसरपंच पोपट पवार, पोलीस पाटील नंदिनी गवळी, बाबुराव पवार, संतोष दे. पवार, मोहन कोरके, सचिन हराळे, अनिल सावंत, संजय बागल, संजय शिंदे, सुरेश पवार, पांडुरंग पवार, माणिक पाटील, नागेश उपासे, सागर कडलासकर यांच्यासह दुध उत्पादक शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपसरपंच, श्री. दत्त दूध संकलन केंद्राचे चेअरमन सिद्धेश्वर पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैजिनाथ रणदिवे यांनी केले. आभार प्रशांत जमदाडे यांनी मानले. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !