BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ नोव्हें, २०२२

बाप रे बाप ! बँकेच्या एटीएम मशीनमध्ये चक्क साप !

 


शोध न्यूज : बँकेच्या एटीएम मशीनमधून पैसे बाहेर येतात हे सगळ्यांनाच माहित आहे परंतु स्टेट बँकेच्या एका एटीएममधून चक्क साप बाहेर आला आहे. याचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. 


बँकेचे एटीएम मशीन हे सुरक्षित जागी असते आणि ग्राहक अत्यंत निर्धास्तपणे एटीएम केंद्रात रक्कम काढण्यासाठी जात असतात. या ठिकाणी फसवणुकीच्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत पण अशा मशीनमधून पैशाऐवजी साप येण्याचा प्रकार तसा आजवर ऐकिवात नाही. बुलढाणा जिल्ह्यातील मातोळा येथील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये मात्र एक साप निघाला आणि ग्राहकांत एकाच खळबळ उडाली. पैसे काढण्यासाठी म्हणून काही युवक एटीएम केंद्रात गेले आणि त्यांना तेथे साप दिसला. या सापाला पाहताच त्यांची प्रचंड घाबरगुंडी उडाली. एटीएम केंद्रात एक तर कमी जागा असते आणि ग्राहक अधिक असतात. अशा वेळेला एवढ्याशा जागेत साप दिसल्याने या युवकांना पळून जाणेही कठीण होवून बसले होते. त्यांनी कसाबसा पळ काढून आपला जीव वाचवला परंतु येथे प्रचंड खळबळ उडाली. 

हा साप एटीएम मशिनच्या आत जाऊन बसला होता आणि सहजासहजी तो नजरेसही पडत नव्हता. काही युवकांना दिसला म्हणून युवक बाहेर पळाले खरे, पण आणखी आलेल्या ग्राहकांना या सापापासून निश्चित धोका होता. त्यामुळे या तरुणांनी सर्पमित्राला पाचारण केले. एटीएम मशिनच्या आतल्या बाजूला दडून बसलेल्या या सापाला सर्पमित्राने बाहेर काढले आणि जंगलात सोडून दिले. साप घरात येतात, दुचाकीत जाऊन बसतात अशा प्रकारचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत परंतु एटीएम मशिनच्या आत साप असू शकेल अशी कल्पनाही कुणाच्या मनात येणार नाही. येथे मात्र प्रत्यक्षात एटीएम मशीनच्या आत जाऊन सापाने आश्रय घेतला होता. (Snake in bank ATM machine, panic among customers) त्यामुळे प्रत्येक ठिकाणी दक्ष असणे किती आवश्यक आहे हेच या घटनेने अधोरेखित केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !