शोध न्यूज : आधी बलात्कार आणि नंतर लाथा मारून गर्भपात केल्याच्या आरोपावरून रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) एका पदाधिकाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या असून पिडीत महिलेने अत्यंत धक्कादायक आरोप केले आहेत.
विवाहित असलेल्या महिलेवर आधी वारंवार बलात्कार केला आणि नंतर तिच्याशी लग्न करतो, घर देतो असे आमिष दाखवत पिडीत महिलेचे पुन्हा पुन्हा लैंगिक शोषण केले. तिला तिच्या पतीपासून देखील विभक्त केले आणि बलात्कारातून ती गर्भवती राहिल्यावर तिच्या पोटात लाथा मारून तिचा गर्भपात केला असल्याचा आरोप पिडीत महिलेने केला आहे. या गंभीर तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा (आठवले गट) पदाधिकारी जयकिशन उदकराम कांबळे याला अटक करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरात ही धक्कादायक घटना समोर आली असून जिल्हाभर प्रचंड खळबळ उडाली आहे.
पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी जयकिशन कांबळे याने सदर विवाहित महिलेला तिच्या पतीपासून वेगळे केले, या महिलेस लग्न करण्याचे आमिष तर दाखवलेच परंतु तिला घर देण्याचेही आमिष दाखविण्यात आले. वेगवेगळे आमिष दाखवत आरोपी कांबळे याने पिडीत महिलेवर वारंवार बलात्कार केला. 'तुझ्यासोबत लग्न करीन, तुझ्या मुलांनाही संभाळेन' असा विश्वास देत पिडीत महिलेचे सतत लैंगिक शोषण केले. यातून पिडीत पहिला गरोदर राहिली. त्यानंतर या महिलेने लग्नाची विचारणा सुरु केली. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करण्यात आले परंतु महिलेने लग्नाचा तगादाच लावला होता. महिला सतत लग्नाचा तगादा लावू लागल्याने आरोपी कांबळे याने गर्भवती महिलेच्या पोटात लाथा मारल्या आणि तिचा गर्भपात केला. शिवाय याची माहिती कुणाला दिली तर तुझ्या मुलांना देखील ठेवणार नाही अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हा सर्व प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने पोलिसात धाव घेतली आणि कांबळे याच्या विरोधात तक्रार केली. पोलिसांनी जयकिशन कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करीत कांबळेला बेड्या ठोकल्या आहेत. अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता कांबळे याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (RPI leader Jayakishan Kambale arrested in rape case) दरम्यान पक्षातून देखील त्याची पाच वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. सदर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर याची माहिती सगळीकडे पसरली आणि अनेकांना धक्का बसला. राजकीय पक्षाचे पदाधिकारी म्हणून काम करीत असताना त्याच्यावर झालेल्या गंभीर आरोपांची चर्चा सगळीकडे सुरु झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !