BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ नोव्हें, २०२२

नराधम म्हणतो, "फाशी तर फाशी ! स्वर्गात अप्सरा मिळेल" !

 



शोध न्यूज : श्रद्धा वालकरचा हत्यारा आफताब पूनावाला या राक्षसाची मानसिकता आता समोर आली असून "फाशी तर फाशी, स्वर्गात अप्सरा मिळेल" असे निर्लज्जपणे तो म्हणाल्याचे समोर आले आहे. 


श्रद्धा वालकर या तरुणीची करण्यात आलेली अमानुष हत्या उघडकीस आल्यापासून सतत नवनवी माहिती समोर येत आहे. अत्यंत क्रूर आणि थंड डोक्याने केलेलं हे हत्याकांड देशाला हादरवणारे ठरले आहे.  प्रेयसीचा खून करून तिचे तबल ३५ तुकडे करून ते वेगवेगळ्या भागात फेकून दिले आणि पुरावे राहणार नाहीत तसेच हा प्रकार कुणाच्या लक्षात येणार नाही याची पुरेपूर काळजी एका नराधम तरुणाने घेतली. हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला तेंव्हा ज्याच्या त्याच्या काळजात धस्स झाले आणि माणूस किती राक्षसी क्रूरतेने वागू शकतो याचे हे एक उदाहरण समोर आले. लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या करून तिचे पस्तीस तुकडे केले आणि रोज एक अवयव पिशवीत घालून रात्री तो जंगलात फेकून देत राहिला. त्याचे ही पाप उघडकीला आले आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.


आफताब पूनावाला नावाच्या या नराधमाच्या कृत्याने मानवता हादरली असून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. 'लव्ह जिहाद' चे हे प्रकरण असल्याचे मानले जात असून राक्षसी वृत्तीच्या या नराधमावर पोलिसांच्या उपस्थितीत तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न काल झाला. पोलिसांना या प्रकरणी गोळीबार देखील करावा लागला आहे. श्रद्धाचे ३५ तुकडे करणाऱ्याचे ७० तुकडे आम्हाला करायचे आहेत असे हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाने पोलिसांना सांगितले आहे. या घटनेबाबत जनभावना प्रक्षुब्ध आहेत पण या नराधमाला आपल्या राक्षसी कृत्याचा कसलाच  पश्चाताप नसल्याचे समोर आले असून त्यातून त्याची मानसिकता उघड झाली आहे. 


रागाच्या भरात एखादे कृत्य घडले तर मानवी मनाला नंतर पश्चाताप होत असतो पण या राक्षसाला आपल्या पापाचा कसलाच पश्चाताप नसल्याचे समोर आले आहे. श्रद्धाला मारून टाकल्याचा आणि  तिचे ३५ तुकडे केल्याचा आपल्याला कसलाच पश्चाताप नाही असे तो पोलिसांना म्हणाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या चेहऱ्यावर कसलीही पश्चातापाची भावना नाही शिवाय तो चौकशी संपली की शांतपणे झोपी जात असायचा. (Hanging is hanging! Aftab Poonawala has no regrets) अशी माहिती तर पोलिसांनी दिलीच आहे पण त्यापेक्षाही भयानक आणि तितकेच धक्कादायक विधान देखील त्याने केले आहे. 


आफताब पूनावालाचे  खुनी  कृत्य उघडकीस आणून पोलिसांनी बारकाईने तपास सुरु ठेवला आहे. प्रत्येक पुरावा गोळा करून त्याला न्यायालयात शिक्षा होईल यासाठी पोलीस दिवसरात्र सखोल तपास करत आहेत. त्याला फाशीचीच शिक्षा व्हावी ही तर देशाची इच्छा आहे आणि पोलीस देखील त्यासाठी प्रचंड परिश्रम घेत आहेत. नराधम आफताब मात्र निर्धास्त दिसत असून "फाशी तर फाशी, स्वर्गात अप्सरा मिळेल" अशा प्रकारचे विधान त्याने केले असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. "फांसी भी मिली तो अफसोस नहीं, जन्नत में मिलेगी हूर" असे विधान या राक्षसी मनोवृत्तीच्या आफताब पूनावाला याने केले आहे. या त्याच्या बोलण्यातून त्याची मानसिकताच समोर आली आहे.


 

(Shraddha Walker's killer Aftab Poonawala's mentality of a demon has now come to the fore and it has come to light that he shamelessly said that "hanging if hanged, you will get a nymph in heaven".)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !