BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ नोव्हें, २०२२

चुकीच्या मार्गाने रेशन घेणाऱ्यांचे रेशन कार्ड होणार रद्द !


दहा लाख कार्ड होणार रद्द !


शोध न्यूज : चुकीच्या मार्गाने रेशन घेणाऱ्यांची आता कोंडी होणार असून सरकार आता अपात्र लोकांचे रेशनकार्डच रद्द करणार आहे त्यामुळे अनेकांना याचा मोठा दणका बसणार आहे.


मागील काही काळापासून सरकार रेशनकार्डाबाबत अधिक दक्ष झाले असून देशातील अनेक लोक चुकीच्या मार्गाने स्वस्त धान्य मिळवत आहेत. यामुळे खऱ्या गरजू लोकांना हे धान्य मिळण्यात अडचण येत आहे. अपात्र असूनही अशा प्रकारे रेशन कार्ड प्राप्त करून त्याचे फायदे घेणाऱ्यांची संख्या अधिक असून याची माहिती शासनाला प्राप्त झालेली आहे. कोट्यवधी नागरिक शासनाच्या मोफत धान्याचा लाभ घेत आहेत. यात अलीकडेच देशभरातून दहा लाख बनावट रेशनकार्ड उघडकीस आली आहेत. या शिधापत्रिका लवकरच रद्द करून त्यांच्या रेशनवर बंदी घातली जाणार आहे. ज्यांच्याकडे बनावट रेशनकार्ड आढळून आली आहेत त्यांच्याकडून रेशनची वसुलीही केली जाणार आहे.  


देशात ८० कोटींपेक्षा जास्त लोक मोफत रेशन कार्डचा लाभ घेत आहेत पण शासनाची ही सुविधा घेण्यास अपात्र असलेले करोडो नागरिक आहेत. अपात्र असूनही कित्येक वर्षांपासून ते या सुविधेचा लाभ उठवत आहेत. दहा लाख रेशन कार्ड ही बनावट आणि अपात्र असल्याची ओळख शासनाने पटवली आहे. अपात्र रेशन कार्ड धारकांची यादी स्वस्त धान्य दुकानदारांना पाठविण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. अशा कार्डधारकांची माहिती जिल्हा प्रशासनाला पाठविली जाणार असून त्यानंतर या नागरिकांची कार्ड रद्द करण्यात येणार आहेत. मोफत धान्य मिळण्यासाठी जे नागरिक पात्र असतील त्यांनाच हे धान्य दिले जाणार आहे. 


'एनएफएसए' नुसार आयकर भरणारे आणि दहा एकरपेक्षा अधिक शेती असणाऱ्या नागरिकांची यादी सरकार तयार करीत असून या लोकांचेही रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे.  (Ineligible ration cards will be cancelled) मागील चार महिन्यात ज्या कार्ड धारकांनी मोफत धान्याचा लाभ घेतलेला नाही शिवाय मोफत रेशनचा व्यवसाय करणारे लोक अशांचीही यादी तयार करण्यात आलेली असून गैर मार्गाने रेशन कार्ड वापरत असलेल्यांची संख्या उत्तर प्रदेशात अधिक असल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे शिधापत्रिका तपासण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. 


 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !