पत्नीच्या उपचाराच्या खर्चाला कंटाळलेल्या अवस्थेत शेळ्याही चोरीला गेल्याने निराश झालेल्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची अंत्यत दुर्दैवी घटना वाळवा तालुक्यात घडली आहे.
संजय चौगुले या तरुणाच्या पत्नीचा अपघात झाला होता त्यामुळे उपचारासाठी मोठा खर्च करावा लागला होता. या खर्चासाठी त्याने कर्ज घेतले होते. एकीकडे कर्ज फेडायचे असताना दुसरीकडे पत्नीच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती त्यामुळे तो वैफल्यग्रस्त झाला होता. अशाच अवस्थेत त्याचा काही शेळ्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या. कर्जाचा डोंगर, पत्नीची प्रकृती आणि शेळ्यांची चोरी यामुळे तो खचून पिचून गेला. चोरीला गेलेल्या शेळ्या शोधण्यासाठी पत्नीसह तो कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव येथे गेला. तेथील जनावरांच्या आठवडा बाजारात त्याने आपल्या शेळ्यांचा शोध घेतला परंतु त्याच काही उपयोग झाला नाही त्यामुळे त्याची निराशा वाढली आणि निराशेतच घरी परतला. (Desperate youth commits suicide after goats are stolen) घरी आल्यानंतर घराच्या शेजारी असलेल्या शेतातील शेडमध्ये गळफास घेवून त्याने आपले आयुष संपवले.
निराशा आणि आत्महत्या यांचे घट्ट नाते असले तरी कुणाला कधी कशामुळे निराशा येईल आणि तो टोकाचे पाउल उचलेल याचा भरवसा राहिला नाही. त्यात आर्थिक कारणाने पिचून गेल्यावर एखादी सामान्य घटना देखील प्रचंड निराश करून जाते. असाच प्रकार संजय चौगुले या तरुणाच्या बाबतीत घडला आहे. पत्नीच्या उपचाराचा खर्च करण्यासाठी घेतलेले कर्ज फेडणे अशक्य होत असतानाच पत्नीही ठीक होत नसल्याचे नैराश्या या तरुणाला होते आणि अशा निराश हताश अवस्थेत त्याच्या शेळ्या चोरीला गेल्या. चोरीच्या या घटनेचा त्याच्या मनावर एवढा विपरीत परिणाम झाला की त्याने आपल्या आयुष्याची अखेर करण्याचाच निर्णय घेतला. पत्नीच्या उपचारासाठी लाखोंचा खर्च त्याने केला पण पत्नी ठीक होत नसल्याने आधीच तो मनाने खचून गेला होता.
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !