BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ नोव्हें, २०२२

खून करून मृतदेहाची विटंबना, मुंडके कापून खेळला फुटबॉल !



शोध न्यूज : माणसातील क्रूरता किती वाढत आहे याचे दर्शन देणारी एक क्रूर घटना समोर आली असून एका तरुणाचे मुंडके कापून चक्क लाथेने ठोकरत फुटबॉल खेळला गेल्याचे समोर आले आहे. 


चुकून किडा मुंगी मारली गेली तर कित्येक माणसांचे मन कळवळते परंतु माणूसच माणसाचा सहज जीव घेऊ लागला आहे. कुठल्यातरी रागातून माणूस एकमेकांच्या जीवावर उठतो. किरकोळ कारणासाठी मित्रच मित्राचा जीव घेतो तर जन्मदात्या आई वडिलांना देखील मुलगा अत्यंत निर्दयपणे मारून टाकतो अशा अनेक घटना रोज आपल्या आजूबाजूला घडत असतात पण चंद्रपूर येथील एका घटनेने मानवताच हादरून गेली आहे. येथे एका तरुणाचा खून करण्यात आला आणि नंतर त्याचे मुंडके कापून चक्क फुटबॉल खेळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माणूस किती निर्दयी होऊ शकतो याचे यापेक्षा वेगळे उदाहरण काय असणार आहे !


दुर्गापूर येठीओल महाऔष्णिक वीज केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ ३२ वर्षे वयाच्या महेश मेश्राम या तरुणाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली. पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या एका बियर बारमध्ये महेश मेश्राम आणि अज्ञात लोकांशी भांडण झाले. हे भांडण एवढे विकोपाला गेले की महेशला त्यांनी पेट्रोल पंप परिसरात आणले. तेथे दगडाने ठेवून त्याची हत्या केली आणि नंतर धारदार शस्त्राने त्याचे मुंडके धडावेगळे केले. एवढे करून ते निघून गेले नाहीत तर त्याचे मुंडके घेऊन फुटबॉलसारखे पायाने लाथाडत खेळले असल्याचा प्रकार परिसरातील काहींनी पहिला. मानवतेला लाजवणारा हा प्रकार माणूस म्हणवून घेणाऱ्यानीच केला आहे.  


मयत मेश्राम याची काही दिवसांपूर्वी एकाशी वादावादी झाली होती आणि त्यावेळी महेश मेश्राम याने त्या व्यक्तीला मारहाण केली होती. याच वैमनस्यातून त्याची हत्या करण्यात आली आणि त्याच्या मृतदेहाची अमानवी पद्धतीने विटंबना देखील करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. (Murder and mutilation of dead body) पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून या घटनेत सहा ते सात लोक सहभागी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत परंतु अत्यंत क्रूर अशा या घटनेचा समाजातून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !