BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ नोव्हें, २०२२

शिवसेना खासदार संजय राऊत यांची अटकच बेकायदेशीर ! ईडी वर न्यायालयाचे ताशेरे !

 



शोध न्यूज : शंभर दिवस तुरुंगात राहिलेले शिवसेनेचे खासदार संजय राउत यांना ईडी ने केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे सांगत न्यायालयाने ईडीच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत.   


शिवसेनेचा 'वाघ' संजय राऊत हे तब्बल शंभर दिवसानंतर बाहेर आले असून शिवसैनिकांनी प्रचंड जल्लोषात त्यांचे स्वागत केले तर राज्यभर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ते बाहेर येवू नयेत यासाठी ईडीने अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले पण अखेर न्यायालयाने ईडी ला फटकारले आणि संजय राऊत, त्यांचे बंधू प्रवीण राऊत यांना जामीन मंजूर केला. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शंभर दिवसांपासून संजय राऊत तुरुंगात होते. महाविकास आघाडी सरकार खाली खेचण्यासाठी मदत न केल्यास ईडीकडून कारवाई करण्याची आपल्याला धमकी आली असल्याचे संजय राउत यांनी आधीच पत्रकार परिषदेतून जाहीरपणे सांगितले होते. 


शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपण झुकणार नसल्याचे सांगत ईडी कारवाईचा सामना करू असे देखील सांगितले होते आणि त्यानंतर काही दिवसात संजय राउत यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. राजकीय हेतूने आपल्याला अटक करण्यात आली असून ही अटक बेकायदेशीर आहे असे राऊत वेळोवेळी सांगत होते परंतु आज न्यायालयाने देखील असेच स्पष्ट केले आहे. पीएमएल कोर्टाने ईडीवर ताशेरे ओढले आहेत आणि राऊत बंधूंच्या अटकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ईडी ने आपल्या मर्जीने आरोपी निवडले असून संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.  


न्यायालयाने राऊत बंधूच्या जामिनासाठी तब्बल १२२ पानी आदेश काढलेले असून यातील पान क्रमाक १२० वर या अटकेबाबत स्पष्टपणे भाष्य केले आहे. मुद्दा क्रमाक १५३ मध्ये न्यायालयाने म्हटले आहे की "कोर्टाला असे वाटते की, या दोन्ही आरोपींना बेकायदेशीररित्या अटक केली आहे. राकेश वाधवान आणि सारंग वाधवान हे मुख्य आरोपी असूनही त्यांना अटक करण्यात आलेली नाही"  त्यामुळे संजय राऊत यांना करण्यात आलेली अटक ही बेकायदेशीर आहे यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. (The arrest of Shiv Sena MP Sanjay Raut is illegal)  संजय राऊत हेच कथित घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहेत असे ईडीकडून सांगितले जात होते परंतु ही अटकच अवैध असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.


तब्बल १०१ दिवस तुरुंगात राहिलेले शिवसेनेचे वाघ आज ईडी च्या पिंजऱ्यातून बाहेर आले असून महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. राज्यभरातून शिवसेनेने  जल्लोष केला असून पेढे वाटून आणि गुलाल उधळून आनंद साजरा करण्यात येत आहे. राऊत यांच्या मालमत्ता देखील ईडीने जप्त केल्या असून या सर्व प्रकरणात राऊत बंधू यांना प्रचंड त्रास झाला आहे आणि आता त्यांना करण्यात आलेली अटक हीच बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 


हेच सांगत होतो - राऊत 

न्यायपालिकेवरील आपला विश्वास वाढला असून आपण आधीपासून हेच सांगत होतो. आज न्यायालयाने देखील तसे निरीक्षण नोंदवले आहे अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी तुरुंगाच्या बाहेर आल्यावर व्यक्त केली आहे. सुटका झाली याचा आनंद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !