शोध न्यूज : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा वादात अडकले असून त्यांनी पायात चप्पल घालून शहीदाना अभिवादन केल्याने वाद ओढवला आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात बोलतना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच आक्षेपार्ह विधान केले असून त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. राज्यपाल हे घटनात्मक पद असून या पदाचा सन्मान सर्वोच्च आहे आणि या पदाचा मान या पदावरील व्यक्तीनेही राखणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात प्रथमच राज्यपाल या पदावरील व्यक्तीच्या विरोधात राज्यभर निषेध आणि आंदोलने होत आहेत. राज्यपाल हटाव मोहीम राबवली जात आहे. भाजप वगळता राज्यातील सर्व पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करूनही भाजपने कोश्यारी यांचीच पाठराखण केल्याचा ठपका ठेवत अनेक पक्षांनी भाजपावर देखील आगपाखड केलेली आहे. हा वाद धुमसता असतानाच कोश्यारी यांनी आता आणखी एक नवा वाद निर्माण केला आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी शहिदांचा अवमान केला असल्याचा आरोप होऊ लागला असून राज्यपालांच्या कृतीचा जोरदार निषेध होऊ लागला आहे. १४ वर्षांपूर्वी म्हणजे २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात अनेक निरपराध नागरिक मारले गेले होते आणि पोलिसातील शूर अधिकारी, कर्मचारी यांनी अतिरेक्यांशी निकराचा लढा दिला होता. या लढ्यात पोलीस अधिकारी, कर्मचारी शहीद झाले होते. मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालून या शूर अधिकारी, कर्मचारी यांनी मुंबई वाचवली होती. हे करीत असताना त्यांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. या शहिदांना देश नमन करीत असताना आज हा प्रकार घडला असून याचे पडसाद देखील उमटू लागले आहेत.
आज या हल्ल्याला १४ वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना आदरांजली वाहिली. याचवेळी राज्यपाल कोश्यारी यांनी पायात चप्पल घालून ही आदरांजली वाहिली त्यामुळे हा शहिदांचा अपमान आहे अशी भावना अनेकांची झाली आहे. कोश्यारी यांची राजकीय कारकीर्द भारतीय जनता पक्षात गेली आहे. कधीकाळी सुसंस्कृत म्हणून ओळखला जाणाऱ्या पक्षात काम केलेले असतानाही शहीदांना आदरांजली अपर्ण करताना पायातील चप्पल काढावी असे राज्यपाल यांना वाटले नाही त्यामुळे संताप आणि नाराजी याचे पडसाद उमटू लागले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आदरांजली वाहताना पायातील पादत्राणे बाजूला काढली परंतु राज्यपाल कोश्यारी यांनी मात्र पायात चप्पल घालूनच आदरांजली अर्पण केली आहे.
अभिवादन करताना पादत्राणे बाजूला काढून ठेवणे ही भारतीय संस्कृती आहे, महाराष्ट्राची संस्कृती आणि महापुरुषांचा अनादर सातत्याने करणाऱ्या राज्यपालांनी हुतात्म्यांचाही अनादर केला. यावेळी मुख्यमंत्री यांनी त्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली असती तर बरे झाले असते असे कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटले आहे तर भाजपचे केशन उपाध्ये यांनी राज्यपालांच्या कृतीचे समर्थन केले आहे. '२६/११ च्या अभिवादन कार्यक्रमात बूट किंवा चप्पल काढली जात नाही. (Governor again in controversy, saluting martyrs wearing slippers) तशा पद्धतीचे ब्रिफिंग पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त अभिवादन करायला येणार्या मान्यवरांना करीत असतात', असं केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
ॲड. सदावर्तेंवर शाईफेक!
मराठा आरक्षण विरोधक ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचा अंगावर सोलापुरात संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांनी शाई फेकली आणि निषेधाच्या घोषणा दिल्या. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सदावर्तेंचा निषेध, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी असलेले सोमनाथ राऊत यांनी सदावर्ते यांच्या अंगावर शाई फेकली. त्यानंतर बोलताना 'मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या सदावर्तेंना महाराष्ट्रात कुठेही फिरू दिले जाणार नाही, त्यांची अशीच गत केली जाईल', असा इशारा देखील त्यांनी दिला. "जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा" अशा घोषणाही त्यांनी यावेळी दिल्या .
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !