BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ नोव्हें, २०२२

आ. शहाजीबापू पाटील यांच्यावर व्यक्तिगत बोलाल तर -----



शोध न्यूज : सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर व्यक्तिगत आयुष्यावर भाष्य कराल तर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा माजी पंचायत समिती सदस्य ॲड. बंडू काशीद यांनी दिला आहे.


शिवसेनेतून फुटून शिंदे गटासोबत गेलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांची आता राज्यभर चर्चा सुरु आहे. शहाजीबापू पाटील हे उच्चशिक्षित आहेत आणि त्यांचे वक्तृत्व देखील पूर्वीपासूनच सभा जिंकणारे ठरले आहे. त्यांच्या सभा नेहमीच गाजत आलेल्या आहेत. मोजक्या मतांनी त्यांचा विजय झालेला असला तरी त्यांची सभा ऐकण्यासाठी कायमच गर्दी होत असते. शिवसेनेतील बंडाळीनंतर मात्र ते राज्यभर प्रसिद्ध झाले ते 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील .. ओक्के" या संवादाने ! त्यांच्या या संवादावर गाणी देखील आली आणि राज्याच्या कोनाकोपऱ्यात शहाजीबापू पोहोचले आहेत. जशी प्रसिद्धी मिळाली तशी टीका देखील होताना समाजमाध्यमावर दिसून आले आहे. 


एकीकडे वाढती प्रसिद्धी मिळत असताना दुसरीकडे टीका देखील होत राहिली आहे आणि या टीकेची तमा आ. पाटील यांनी बाळगली नाही. परंतु त्यांचे समर्थक असलेले एड. बंडू काशीद यांनी मात्र समाजमाध्यमावर व्यक्तिगत पातळीवर टीका करणाऱ्याना इशारा दिला आहे. आ. शहाजीबापू पाटील यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यास थेट गुन्हे दाखल करणार असल्याचे काशिद यांनी म्हटले आहे.  काहींही कायदेशीर पुरावा नसताना, कोणतीही तक्रार नसताना काही जण आ. पाटील यांच्यावर बेछूट आरोप करीत आहेत, राजकीय, सामाजिक आणि व्यक्तिगत प्रतिमा मलीन करीत आहेत, ज्या गुन्ह्यात आमदार पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे त्यावर भाष्य केले जात आहे आणि खाजगी तसेच कौटुंबिक जीवनात डोकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे प्रकार करण्यात येवू नयेत असे देखील काशीद यांनी बजावले आहे. 


विरोधकांकडे काहींही भांडवल उरले नाही त्यामुळे व्यक्तिगत आणि कौटुंबिक मुद्दे पुढे केले जात आहेत आणि आ. पाटील यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे आहे. प्रतिमा मलीन करण्याचा विरोधकांचा डाव आहे पण आ. पाटील अशा प्रकारांना भीक घालणार नाहीत. ज्यांनी जाणीवपूर्वक त्यांची बदनामी करण्याचे कारस्थान सुरु केले आहे त्यांची आता गय केली जाणार नसून त्यांच्यावर गुन्हे दाखल केल जाणार आहेत. (criticize personally, legal action, warning to social media) यापुढे कुणीही सोशल मीडियात आक्षेपार्ह लेखन अथवा काही भाष्य केले तर त्यांना कायदेशीर उत्तर मिळेल आणि त्यांना न्यायालयात खेचले जाईल असा इशारा एड काशीद यांनी दिला आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !