BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ नोव्हें, २०२२

महिला वाहतूक पोलिसांना मारहाण करून भररस्त्यावर विनयभंग !

 



शोध न्यूज : ड्युटीवर असलेल्या महिला पोलिसांचा विनयभंग करून मारहाण केल्याची घटना आळंदी येथे घडली असून या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून आळंदी येथे भाविकांची गर्दी होत आहे. भाविकांच्या गर्दीमुळे पोलिसावर ताण आलेला असून वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीचे नियमन करणे देखील तितकेच महत्वाचे बनले आहे. अशाच वाहतुकीचे नियमन करणाऱ्या महिला पोलिसांना मारहाण करून विनयभंग करण्याचा प्रकार समोर आला आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दुचाकीवरील भूषण गीते आणि दत्तात्रय कोकरे यांना महिला वाहतूक पोलिसांनी रोखले. अडविल्याचा राग आल्याने आळंदी येथील भूषण मनोज गीते आणि खेड येथील दत्तात्रय रामा कोकरे यांनी महिला वाहतूक पोलिसांना शिवीगाळ केली. मारहाण करीत विनयभंग केला. अशा प्रकारची फिर्याद दिल्यानुसार पोलिसांनी या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


दुचाकी रोखली असताना भूषण याने आरडाओरडा केला आणि महिला पोलिसाला ढकलून दिले. त्यांच्या मनाला लज्जा वाटेल अशा प्रकारे कृत्य केले यावेळी इतर पोलीस कमर्चारी पुढे आले तेंव्हा त्यानाही शिवागाळ केली. भूषण याच्या या कृत्याला दत्तात्रय याने देखील साथ दिली अशा प्रकारची फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा तसेच विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Female Traffic Police beaten up and molested) या ठिकाणावरून आरोपी पळून जात असताना जमावाने त्यांना मारहाण केली तसेच पळून जाताना लोखंडी पोलला धडकून ते किरकोळ जखमी झाले आहेत अशीही नोंद करण्यात आली आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !